राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला भाजपचा फसवा डाव ठरवत, महिला आरक्षणात ‘डिलिमिटेशन’ची अट घातल्याबद्दल टीका केली. अमली पदार्थांच्या तस्करीवरून त्यांनी गृहखात्याला धारेवर धरले असून, नाशिकमधील भोंदूगिरी प्रकरणातील संशयास्पद मृत्यू हा बड्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. पोटनिवडणुकीत भाजपकडून धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात असल्याचा दावा करत, मतदारांनी धर्माऐवजी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. तसेच विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.