Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : रस्त्यासाठी जागा देण्यास वन खात्याचा विरोध ; आदिवासी कार्यकर्त्यांचे आत्मदहन आंदोलन

तालुक्यातील माथेरान डोंगर रांगांमधील आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता वन विभागाच्या परवानगी विना अर्धवट आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 20, 2026 | 07:10 PM
Matheran News : रस्त्यासाठी जागा देण्यास वन खात्याचा विरोध ; आदिवासी कार्यकर्त्यांचे आत्मदहन आंदोलन
Follow Us
Follow Us:
  • रस्त्यासाठी जागा देण्यास वन खात्याचा विरोध
  • आदिवासी कार्यकर्त्यांचे आत्मदहन आंदोलन
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील माथेरान डोंगर रांगांमधील आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता वन विभागाच्या परवानगी विना अर्धवट आहे. रस्त्याच्या कामाला परवानग्या मिळत नसल्याने वन विभागाच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन आंदोलन करण्याचा निर्धार आदिवासी समाजाचे कार्यकर्ते यांनी केला आहे. उद्या 21 एप्रिल रोजी कर्जत येथील वन विभागाच्या कार्यालयाबाहेर हे आत्मदहन आंदोलन होणार असून माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांमधील लोक त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे.

कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी दळी जमिनीतून रस्ता करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा 13 किलोमीटर लांबीचा रस्ता बनविण्यास परवानगी दिली आहे. मात्र वन विभाग त्या जमिनीतून रस्ता करण्यास परवानगी देत नाही आणि त्यामुळे आदिवासी कार्यकर्ते आत्मदहन करणार आहेत. जैतू पारधी आणि गणेश पारधी हे आत्मदहन करणार असून या रस्त्यासाठी हे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत.

कर्जत तालुक्यातील माथेरान चे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्या वन जमिनीवर वसल्या आहेत. तब्बल 200 वर्षे जुन्या असलेल्या या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता शासन तयार करीत आहेत. त्यातील संबंधित 12 आदिवासी वाड्‌या ह्या माथेरान डोंगर पट्ट्‌यात पिढयांनपिढ्‌या ब्रिटिश काळापासून वसलेल्या असून स्वातंत्र मिळून 78 वर्षे होऊन सुद्धा रस्त्यापासून वंचित आहोत. आदिवासी लोकांना रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने वाटेतच दोन आदिवासी लोकांचे मृत्यू झाले आहेत.

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन

कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे. वन विभागाने या रस्त्यातील काही भागाला अद्याप परवानगी दिलेली नाही. माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतमधील रस्त्यासाठी वनविभागाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. कायद्यात बसत असून सुद्धा वनविभाग कार्यालयाकडून जाणीवपूर्वक मंजुरी मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज नाराज आहे.

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीत जाणीपूर्वक वनविभागाकडून 3/2 चा दावा मंजूर केला नाही. कायद्यातबसून सुध्दा वनविभाग कार्यालयाकडून जाणीपूर्वक मंजूरी मिळत नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते गणेश पारधी आणि जैतू पारधी हे उद्या मंगळवार 21 एप्रिल रोजी वनविभाग कार्यालय कर्जत येथे आत्मदहन करणार आहेत. त्या दोन्ही कार्यकर्त्यांनी आत्मदहन करू नये यासाठी वन विभागाचे वनक्षेत्रपाल समीर खेडेकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी प्रयत्न केले. मात्र वन विभाग दोन वर्षात परवानगी देऊ शकले नाही आणि त्यामुळे वन विभागाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन होणार आहे.

Karjat News : टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश

 

Web Title: Matheran news forest department opposes giving land for road tribal activists self immolate protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • matheran news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
3

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.