हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत समाजातील नेत्यांनी मोठा निर्णय घेतला.येत्या ४ ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली. माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली.