दिवा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सुरू करण्यात यावी यासाठी दिव्यातील नागरिक रस्त्यावर उतरले आहे. मध्य रेल्वेवरील दिवा स्थानक हे दिवा जंक्शन असल्याने सर्व जलद लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्या यासाठी मागील अनेक वर्षा पासून निवेदन, स्वाक्षरी मोहीम, मोर्चा आणि आमरण उपोषण करूनही प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने गेल्या वीस दिवसांपासून समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे या धरणे आंदोलन करत आहे. मात्र मागील वीस दिवसांत रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने दिवा शहरातील जनतेच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला. रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून प्रतिकृती बनवून रेल्वे प्रशासनास पाया खाली तुडवण्यात आले. रेल्वे प्रशासनाने मंगळवार पर्यंत दखल न घेतल्यास रेल रोको करणार असल्याचे अमोल धनराज केंद्रे यांनी यावेळी सांगितले. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून मागील चार दिवसांपासून विकास इंगळे हे देखील आमरण उपोषण करण्यास बसले आहे.