खेड नगरपरिषद हद्दीतील सुमारे दोन हजार वर्षे जुन्या बौद्ध लेण्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे समोर आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत लेण्यांमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेट व गुटखा आढळून आल्याने हे ठिकाण दारुड्यांचे अड्डे बनल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवक अध्यक्ष सुरज तांबे यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलत लेण्यांच्या देखरेखीसाठी कर्मचारी नेमण्याचे आश्वासन दिले आहे.