Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

मुंबईत उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित होते.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 21, 2026 | 08:15 PM
फोटो सौजन्य: @CMOMaharashtra/ X.com

फोटो सौजन्य: @CMOMaharashtra/ X.com

Follow Us
Follow Us:
  • रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा
  • पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे – सी.पी.राधाकृष्णन
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कौशल्य विकास मंत्र्यांची हजेरी
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे काळाची गरज आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा मुंबईतील लोकभवन येथे पार पडला, त्यावेळी सी.पी.राधाकृष्णन म्हणून बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक

रतन टाटा: सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण

तरुणांना मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, “उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाचा वाटा भारताला ‘ग्लोबल स्किल हब’ बनवण्यात मोठा असेल.” तसेच त्यांनी भारतीय तरुणांना जपानी लोकांप्रमाणे कामाप्रती निष्ठा आणि शिस्त अंगीकारण्याचे आवाहन केले.

‘एआय लिविंग लॅब’ आणि तंत्रज्ञानावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ‘एआय लिविंग लॅब’ उपक्रमाचे कौतुक केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. “महाराष्ट्र हे स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्नमध्ये देशात आघाडीवर आहे. भविष्यात आपण युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यापीठाने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने १०,००० महिलांना एआय प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली.

कोकणात स्टार्टअप आणि नवोपक्रमांना आर्थिक पाठबळ, ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी; सरकारकडून 2.5 कोटींचा निधी

कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा कणा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांनी नाविन्यता आणि प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नमूद केले की, प्राचीन काळी भारत प्रत्येक घरातील कौशल्यामुळेच ‘सोने की चिडिया’ होता, तीच परंपरा आपल्याला पुन्हा उभी करायची आहे.

विद्यापीठाचा ऐतिहासिक टप्पा

कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पहिल्याच दीक्षांत सोहळ्यात २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रे व पदव्या प्राप्त केल्या आहेत. विद्यापीठाने जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्समधील जागतिक संस्थांशी करार केले असून ७०० विद्यार्थ्यांना परदेशात रोजगारक्षम बनवण्यात येत आहे.

या सोहळ्यात ६ सुवर्णपदक विजेत्यांचा आणि राज्यातील उत्कृष्ट आयटीआय (ITI) संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शेवटी, ‘जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शना’चे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

Web Title: Kaushalya vikas ratan tata skill university convocation 25000 students degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • maharashtra news
  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.