मुंबई: बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रेम वक्ते संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांनी ‘नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर अँड रियल्टी कॉन्क्लेव्ह २०२५’ कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी बोलताना स्वामींनी मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने माणसाचा आंतरिक विकास (Internal Development) किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. स्वामींनी बीएपीएस संस्थेच्या माध्यमातून जगभर होत असलेल्या आणि झालेल्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. तसेच, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रियल्टी (स्थावर मालमत्ता) क्षेत्रात काम करताना गुणवत्ता आणि सचोटी (Integrity) ठेवून वेगाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.