नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून पुन्हा एकदा आंदोलनाचे वातावरण पेटले आहे. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांचा सातत्याने आग्रह आहे की विमानतळाला माजी खासदार, ओबीसी नेते व जनता साठी संघर्ष करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे. मात्र सरकारकडून अजूनही कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याने समाजातील नाराजी वाढत आहे. दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर, विशेषतः भूखंड हक्कांसाठी, मोठा संघर्ष केला होता. स्थानिक आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, कराडी, शूद्र आदी समाज घटकांना त्यांचे योगदान महत्वाचे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने याआधी बाळासाहेब ठाकरे हे नाव मागे घेतल्यामुळे दि. बा. पाटील यांच्या नावाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. नामकरणाचा निर्णय वारंवार लांबणीवर टाकल्याने नाराजी तीव्र झाली आहे. नवी मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई व पालघरपर्यंतच्या समाजात असंतोष आहे. ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी इशारा दिला आहे की जर दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात आले नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक आक्रमक आणि उग्र होईल. हा प्रश्न केवळ नामकरणाचा नसून स्थानिक भूमिपुत्र आणि ओबीसी समाजाच्या अस्मितेचा व न्यायाच्या मागणीचा आहे. निर्णयात होणारा विलंब हा समाजाच्या भावनांचा अपमान म्हणून पाहिला जात असून त्यामुळे आगामी काळात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.