Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

लाउडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्माचा आवश्यक भाग नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने कायदा अंमलबजावणी यंत्रणांना आवाज प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2025 | 03:03 PM
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल(फोटो सौजन्य-X)

ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल(फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य, नवी मुंबई: उत्सव काळात सण साजरे करताना कायद्याच्या चौकटीत राहून करणे बंधनकारक असते. मात्र काही हौशी राजकारणी आपणच सरकार असल्यासारखं वागत, नियम पायदळी तुडवतात. अशाचप्रकार नेरुळमधून समोर आला असून एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर नियम मोडल्या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सव सण सध्या जोरदार सुरू आहे. अशातच हे सण साजरे करताना मंडळाला पोलीस ठाणे, अग्निशमन विभाग, विद्युत विभाग, महानगरपालिका, या सर्व आस्थापनांच्या परवानग्या सोबतच, ध्वनी प्रदूषण होणार नाही याबाबत देखील काळजी घ्यावी लागते. विविध क्षेत्रात ध्वनी मर्यादा किती असावी याची निश्चिती करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा 70 डेसिबल तर रात्री 75 डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65 डेसिबल तर रात्री 55 डेसिबल, रहिवासीक्षेत्रात दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा 50 देसी बल तर रात्री 40 डेसिबल, एवढी ध्वनी मर्यादा ठेवण्यात आली आहे. तरी देखील काही उत्सवकर्ते कायदा आपला गुलाम असल्यासारखं वागत या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत.

कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

शासनाने शेवटचे तीन दिवस दांडिया खेळायला रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. पण काही हौशी राजकारणी याचा गैरफायदा घेत, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करतात. नेरूळ सेक्टर 16/18 मधील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, विजय माने यांच्यावर सार्वजनिक रोडवर ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करून, पोलिसांनी दिलेल्या निर्देशाची व आदेशाची अवहेलना केल्याबद्दल, नेरूळ पोलीस ठाण्यात डीएनएस कलम, ध्वनी प्रदूषण नियम, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कृतिमुळे कायदा कोणाचा गुलाम नसून, कायद्याचे सर्व गुलाम असल्याचं दाखवून दिल आहे.

विजय माने हे नेरूळ विभागातून प्रतिनिधित्व करतात. ते माजी नगरसेवक देखील आहेत. जे लोकप्रतिनिधी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत समाजाला मार्गदर्शन करतात, अशाच लोकप्रतिनिधींनी स्वतः कायदा पायदळी तुडवला, तर मग नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडून नेमकं काय शिकावं हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, धार्मिक कारणांसाठी लाउडस्पीकरचा वापर हा शांतता भंग करतो आणि आवाज प्रदूषण नियमांचे उल्लंघन करतो. त्यावर खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबई हे एक बहुसांस्कृतिक शहर आहे आणि शहराच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. सार्वजनिक हितासाठी अशा परवानग्या देण्यात येऊ नयेत. अशा परवानग्या नाकारल्याने भारताच्या संविधानातील कलम १९ किंवा २५ अंतर्गत हक्कांचे उल्लंघन होत नाही. लाउडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्माचा अपरिहार्य भाग नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Web Title: A case filed against shiv sena office bearer for violating the noise pollution law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला
1

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !
2

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Navi Mumbai : क्लिनर अपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही
3

Navi Mumbai : क्लिनर अपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप
4

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.