राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाईट रायडर्स लेडीज बारवर हल्ला केला. “महाराजांच्या पवित्र भूमीत डान्सबार चालू देणार नाही,” असे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत स्पष्ट सांगितल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोन परिसरातील हा बार फोडला. या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मनसे रायगड सचिव केसरीनाथ पाटील यांनी पोलिसांची भेट घेतली. लवकरच संबंधित कार्यकर्ते पोलिसांना सरेंडर करतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.