दोन बैलांच्या खतरनाक लढाईत कुत्रा झाला मध्यस्ती, धावत आला अन् केलं असं काही... पाहून तुम्हीही व्हाल दंग; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. इथे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात कधी हसवतात तर कधी हैराण करून सोडतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओही शेअर केले जातात, ज्यातील रोमांचक दृश्ये नेहमीच लोकांचे मनोरंजन करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये मात्र आता लोकांना हैराण करत आहेत. यात नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन धोकादायक बैल रस्त्यावर एकमेकांशी भांडत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र यात विशेष तेव्हा घडते जेव्हा या दोन शक्तीशाली प्राण्यांमध्ये एक कुत्रा हिरो बनत एंट्री घेतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध दोन मोठे बैल एकमेकांशी भांडत असल्याचे दिसून येते. दोघेही पूर्ण ताकदीने एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लोक दूरवर उभे राहून ही लढाई पाहत आहेत. पण अचानक एक कुत्रा पळत पळत त्यांच्या मधोमध जाऊन उभा होतो आणि भुंकायला सुरुवात करतो. हे दृश्य पाहून असे वाटते की तो दोन्ही बैलामधील लढाई थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की कुत्रा बैलांवर भुंकत राहतो जणू तो लढाई थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कुत्रा बैलांना हाकलून लावताच, ते पुन्हा लढण्याचा प्रयत्न करतात, पण आता कुत्रा हार मनात नाही आणि पुन्हा त्यांच्यामध्ये जाऊन तो भुंकायला सुरुवात करतो. अखेर, कुत्र्याच्या सततच्या प्रयत्नांमुळे, दोन्ही बैल शांत होतात आणि व्हिडिओ इथेच संपतो. युजर्स मात्र हे सर्व दृश्य पाहून हैराण झाले असून हा व्हीडीओ आता वेगाने शेअर केला जात आहे.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @viishal_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटबॅरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “डोगेश भावाच्या एरियात खोडसाळपणा नाही करायचा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जिथे मॅटर मोठा असतो तिथे डोगेस भाऊ उभा असतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.