(फोटो सौजन्य – X)
मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ल्यात पर्यटक आणि स्थानिकांवर लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी अक्षरशः व्यक्तीचे नाव आणि त्याचा धर्म विचारात लोकांवर गोळीबार केला. या हल्लयाचे अनेक फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यातील विदारक दृश्ये पाहून संपूर्ण जग हादरला. डझनभराहून अधिक लोक जखमी झाले असून 26 हुन अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे आणि हा आकडा वेळोवेळी वाढत चालला आहे.
या दहशती हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचवेळी, दहशतवादी हल्ल्याच्या वेळेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर कसा हल्ला केला, त्यावेळी काय घडलं. हल्ल्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून हादरले आहेत.
व्हिडिओमध्ये काश्मीरच्या दऱ्या दिसत आहेत, यात लोकांच्या किंचाळ्या देखील ऐकू आल्या जे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये असे दहशतवाद्यांनी लोकांवर हल्ला केल्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावतानाही यात दिसले.व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीही यावेळी घाबरताना दिसला. यात पुढे एक मोठा स्फोट ऐकू येतो आणि सर्व बाजूंनी ओरडण्याचा आवाज येतो, तर काही लोक धावतानाही दिसतात. हल्ल्याच्या वेळीचे दृश्य वर्णन करणे खूप कठीण आहे पण व्हिडिओ पाहून, लोकांच्या मनावर दहशतीचा किती परिणाम झाला असेल याची कल्पना करता येते.
पहलगाम हमले का खौफनाक वीडियो आया सामने, निर्दयता से निशाना बने हिंदू टूरिस्ट।
.
.
.#JammuAndKashmir #pahalgam pic.twitter.com/lCaSSFjY9h— प्रमोद राजपूत (सनकी .7 ) 🇮🇳🚩 (@pramodsingh_07) April 22, 2025
धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांनी पोलिसांचा बनावटी गणवेश परिधान करत लोकांवर हल्ला केला ज्यामुळे सुरुवातीला लोकांवर त्यांच्यावर संशय आला नाही मात्र काहीच क्षणात त्यांनी लोकांना त्यांची ओळख विचारली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वत्र चेंगराचेंगरी सुरु झाली आणि सर्वत्र भीतीने वातावरण पसरू लागले. दरम्यान हल्ल्याचा हा लाइव्ह व्हिडिओ @pramodsingh_07 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.