अद्भुत! माशाने शिकार समजून सापाला पकडलं तोंडात, मृत्यूच्या जाळ्यात अडकलाच होता तितक्यात दुसऱ्या माशाने केली मदत; Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे प्राण्यांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात जे नेहमीच लोकांच्या मनोरंजनाचे काम करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात माशाने चक्क एका सापाची शिकार केल्याचे दिसून आले आहे. साप शिकार समजून चुकून सापाला आपल्यात तोंडात पकडतो पण स्वतःच मृत्यूच्या विळख्यात अडकतो. आता सापाला पकडताच साप काही माशाला सोडत नाही पण तितक्यात माशाचा मित्र धावून येतो आणि पुढे काय घडते ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका तलावातील दृश्य दिसून येत आहे. तलावाशेजारी एक झाड असतं आणि या झाडाची फांदी तलावाच्या दिशेने जरा झुकलेली असते. याच फांदीवर एक साप बसलेला असतो आणि तितक्यात एक मासा पाण्यातून जोरदार झेप घेतो आणि शिकार समजून तो सापाला आपल्या तोंडात पकडतो. तयनानंतर होणार काय… साप माशाला आपल्या फणात पकडून ठेवतो आणि काही केल्या माशाला यातून बाहेर पडता येत नाही. मासा तडफडत असतो पण निसर्गाचा खेळही अनोखा आहे आणि या कथेत अजूनही एक मोठा ट्विस्ट शिल्लक होता. पुढे आपल्याला दिसते की, माशाचा मित्र पाण्यावर झेप घेतो आणि सापाच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या मित्राला जोरात पाण्यात खेचून घेतो. मित्राने आपली मैत्री निभावली आणि अक्षरशः मृत्यूच्या घरातून आपल्या मित्राला खेचून बाहेर काढले. हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @the_leader_hindi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुसऱ्या माशाने तुला वाचवले, याला म्हणतात मैत्री” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संकटात कोणीही स्वतःच्या माणसाला सोडत नाही अशी एकता असावी, इथे माशामध्येही एकता दिसून आली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.