मस्करीची झाली कुस्करी! खेकड्याच्या नांग्या पकडून करत होता नको ते चाळे, शेवटी अशी शिक्षा मिळाली की... Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी नको ते पराक्रम करू पाहतात आणि मग स्वतःच स्वतःच्या जाळ्यात अडकतात. तुम्ही इंटरनेटवर ऍक्टिव्ह असाल तर इथे असे बरेच व्हिडिओ व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. आपला जीव धोक्यात घालून लोक नको ते स्टंट करतात. एवढंच काय तर लोक प्राण्यांनाही यात सोडत नाही. धोकादायक प्राण्यांची छेड काढून लोक नको ते करायला जातात आणि यात स्वतःच शिकारी बनतात. आताही अशीच एक घटना घडून आली आहे ज्यात एक व्यक्ती खेकड्यासोबत स्टंट करताना दिसून आला आहे. तो खेकड्याच्या नांग्यांमध्ये आपली जीभ टाकून खेकड्याला धरून पकडतो पण खेकडा कसला गप्पा बसतोय पुढच्याच क्षणी तो व्यक्तीची मस्ती अशी उतरवतो की क्षणार्धातच त्याच्यावर रडायची वेळ येते. व्हिडिओत नक्की काय घडलंय ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका व्यक्तीने आपल्या हातात काळ्या रंगाचा खेकडा पकडल्याचे दिसून येत आहे. खेकड्याच्या नांग्या खुल्या असताना तो यात आपली जीभ ठेवून स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतो. वास्तविक, खेकडा लहान प्राणी असला तरी त्याच्या नांग्या फार खतरनाक ठरतात, त्या इतक्या टोकदार आणि धारदार असतात की यात कोणी अडकला तर त्याची कातडी सोललीचं असं समजा… खेकड्याला पकडताना कधीही त्याच्या नांग्या आधी मारल्या जातात कारण त्याची संपूर्ण ताकद ही त्याच्या नांग्यांमध्ये असते.
अशात व्हिडिओत दिसते की, व्यक्ती खेकड्यांच्या नांग्यामध्ये काही सेकंद आपली जीभ ठेवून आपल्या धीटपणाचे दर्शन दाखवू पाहत असतो पण पुढच्याच क्षणी खेकडा ऍक्टिव्ह मोडमध्ये येतो आणि व्यक्ती जीभ टाकेल तितक्यात आपल्या नांग्या बंद करतो, व्यक्तीची जीभ यात वाईटरित्या अडकली जाते आणि क्षणातच त्याला अश्रू अनावर होतात. आपल्या धारदार नांग्यांमध्ये खेकडा व्यक्तीची जीभ अशाप्रकारे पकडून ठेवतो की वेदनेने त्याला आवाजही करता येत नाही. शेवटी त्याचा मित्र कसाबसा खेकड्याला त्याच्यापासून दूर करतो आणि त्याचा जीव खेकड्याच्या तावडीतून सुटतो. व्यक्तीच्या अतिशहाणपणाची क्षणातच कशी माती होते हे या व्हिडिओतून दिसून येते आणि त्याला जन्माची अद्दल घडते.
हा व्हायरल व्हिडिओ @selected_medicalcases नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बरं झाल, तो यासाठी पात्र होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यात भावाचीच चूक होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जे झालं ते चांगलं झालं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.