शेवटी आईच ती! पिल्लाला वाचवण्यासाठी जंगलाच्या राणीला मादी बिबट्याने दिली झुंज; क्षणातच सिंहीणीला टाकलं ओरबाडून...; Video Viral
स्वामी तिन्ही जागाचा आईविना भिकारी ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. आपल्या आईहुन निस्वार्थी प्रेम या जगात आपल्यावर कुणीही करू शकत नाही. मायेने आपल्याला कुर्वाळणारी आई वेळ आली तर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रणरंगिणीचेही रूप धारण करू शकते अशातच आता जंगलातील आशाच एका आईचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क जंगलाची राणी सिंहिणीला झुंज देताना दिसून आली. मुलाला वाचवण्यासाठी आईने स्वतःच्या जीव धोक्यात घातला खरा पण येत शेवटी नक्की काय घडलं ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात आई बिबट्या तिच्या लहान मुलांसह बिळात आराम करत असते पण याचवेळी तिला जंगलाची राणी म्हणजेच सिंहीणी त्यांच्या दिशेने येत असल्याचे जाणवते ज्यांनंतर मादी बिबट्या सतर्क होते आणि बिळातून बाहेर येते. यादरम्यान तीच बाळ बिळातून बाहेर डोकावताना दिसून येत आणि याचवेळी तिथे सिंहीणीची एंट्री होते. सिंहिणीकडे पाहून स्पष्ट होते की तिचा हेतू शिकार करण्याचा आहे आणि तिची नजर बिबट्याच्या मुलांवर आहे, परंतु ती मुलांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आई बिबट्या येऊन समोर उभी राहते. असे म्हटले जाते की आईसाठी तिचे बाळ तिची सर्वात मोठी ताकद असते. या व्हिडिओमध्येही असेच काहीसे दिसून आले. ती मुलांना मागे लपवते आणि तिच्या सर्व शक्तीनिशी सिंहिणीवर हल्ला चढवते. मादी बिबट्याची ताकद आणि तिच्या नजरेतील द्वेष इतका भयंकर असतो की सिंहीण क्षणातच घाबरून तिथून आपला पळ काढते. बिबट्याची हिंमत आणि मुळाप्रती तिचे असलेले प्रेम पाहून आता सर्वच खुश झाले आहेत आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
विद्यार्थीनींचे हनुमान चालिसावर भरतनाट्यम नृत्य; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral
लढतीचा हा व्हिडिओ @its_jungle_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बिबट्याची आई तिच्या रक्षणासाठी सिंहीणीशी लढते’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जंगलात माता त्यांच्या पिल्लांसाठी जे काही करू शकतात ते पाहून माझे हृदय रडते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या लढाईत, बिबट्या राजा आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आई बिबट्याने हुशारीने सिंहिणीच्या पोटावर स्वतःला घसरून तिची मान पकडून तिला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.