विद्यार्थीनींचे हनुमान चालिसावर भरतनाट्यम नृत्य; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडिया हे केवळ मनोरंजानाचे साधन नसून आपल्या कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम बनले आहे. रोज कोणी चित्रकलेचे व्हिडिओ तयार करत आहेत, तर कोणी डान्सचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहे. कोणी आपल्या लिखानातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे तर कोणी आपल्या कॉमेडीतून. वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. केवळ वाईट गोष्टीच नाही, तर कौतुकास्पद गोष्टी देखील आहेत. सोशल मीडियाचा योग्य वापर करणाारे लोकही आहे.
सध्या सोशल मीडियावर कर्नाटकच्या कॉलेजमधील विद्यार्थीनींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणींनी हनुमान चालीसावर भरतनाट्यम केले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतील पडत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी प्रांगणात जमले आहेत. येथे विद्यार्थीनींचा एक ग्रुप क्लासिकल डान्स करत आहे. हनुमान चालीसावर भरतनाट्यम मुलींनी सादर केले आहे. तेही भर पावसाता. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील नित्ते महालिंग अध्यांत्य मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमधील आहे. तुम्ही पाहू शकता की, विद्यार्थींनी अतिशय जबरदस्त नृत्य सादर केले आहे. इतर विद्यार्थी-विद्यार्थीनी त्यांचे नृत्य पाहून उत्साह वाढवत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी कौतुक केले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @prarthana_nanana या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, पावसाने त्यांचे नृत्य अधिक सुंदर केले, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, यामध्ये एक मुलगा देखील नृत्य सादर करताना दिसत आहे. तर आणखी एका युजरने अगदी सुंदर आणि सुबक पद्धतीने नृत्य सादर केले आहे, आणि पावसामुळे तर याला चारचांद लागले आहेत.
बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.