यूके व्लॉगरचा विचित्र प्रयोग; KFC बर्गरसोबत खाल्ली जलेबी, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही खाद्यापदार्थांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असते. अनेक खाद्यप्रेमी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर व्लाग बनवताना दिसतात. खाण्याच्या हौशी असणाऱ्यांचे आणि ते बनवणाचे हौशी असणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. काहीजणांना जेवण बनवून दुसऱ्यांना खाऊ घालायाला आवडते, तर काहींना त्याचा अस्वाद घ्यायला आवडतो. यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रमाण खाण्यावरही एक्सपिरीमेंट होत असतात. कोणी कधी काय बनवेल आणि कोणी कधी काय कॉम्बो करुन खाईल सांगता येत नाही.
कधी कोणी चॉकलेट समोसा खाईल, तर कधी कोणी चीज आईसक्रीम खाताना दिसेल. कधी गुलाबाचे वडे तळताना दिसेल, तर कधी कोणी परदेशी खाद्यपदार्थांना भारतीय स्टाईलमध्ये बनवताना दिसेल. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका परदेशी तरुणााने असे काही केले आहे की, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण KFC बर्गर सोबत जलेबी खाताना दिसत आहे. चिकन झिंगर बर्गर आणि जलेबी एकत्र करुन तरुणाने खाल्ली आहे. त्याने सॅंडविच करुन बर्गर आणि जलेबी खाल्ली आहे. खाताना देखील खूप छान लागत असल्याचे तो म्हणत आहे. पण काही भारतीयांनी यावर टीका केली आहे.
विद्यार्थीनींचे हनुमान चालिसावर भरतनाट्यम नृत्य; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tripleeatsfood या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी ट्राय करुन बघितले पाहिजे असे म्हटले आहे. सोशल मीडियावर खाद्यप्रेमींमध्ये वाद सुरु आहे. एका युजरने म्हटले आहे की, हे अगदी चुकीचे आहे, जलेबीला जास्त आदर मिळाला पाहिजे, तर एका युजरने गोड आणि तिखट कॉम्बो मस्त लागतो, ट्राय केला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.