A person slaps a Muslim passenger Fight in Indigo Plane video viral
अलीकडे सोशल मीडियावर रोज लाखो वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी भयावह, कधी भांडणाचे व्हिडिओ सतत पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इंडिगो विमानामध्ये एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वत्र उडाली आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला एका दुसऱ्या व्यक्तीने कानाखाली लगावली आहे. सांगण्यात येत आहे की, या घटनेनंतर तरुण बेपत्ता झाला आहे. हा तरुण आसाममधील काचर जिह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाला कानाखाली मारल्यानंतर पॅनिक अटॅक आला असल्याचाही दावा केला आहे. एअरलाइन्सच्या एका कर्मचाऱ्याने कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र त्याने कर्मचाऱ्याचे ऐकले नाही सध्या या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोलकाताहून सिलचराला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटमध्ये ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिलचर विमानतळावर त्याचे कुटुंबीय वाट पाहत होते, परंतु तो पोहोचला नसल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहू शकता की, विमानात दोन प्रवाशांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. यातील एक तरुण मुस्लिम आहे. दुसऱ्या प्रवासी या तरुणाला जोरात कानाखाली मारतो. यामुळे तरुण खाली पडतो. यावेळी फ्लाइट अटेंडंट हे सर्व थांबण्याचा प्रयत्न करत असते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
<
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @adilsiddiqui7 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “माणुसकी मरत चालली आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने बाकीच्या प्रवाशांनी त्याला थांबवण्याता का प्रयत्न केला नाही असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने समाज इतका असंवेदनशील होत चालला आहे असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका युजरने नेमकं कशावरुन भांडण झाले असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.