(फोटो सौजन्य: X)
जंगलाचे आयुष्य हे मानवाच्या आयुष्याहून काहीस वेगळं असतं. आपल्याकडे हुकूमशाही संपली असली तरी जंगलात मात्र अजूनही धोकादायक शिकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळते. यातच सिंह हा आपल्या बलाढ्य शक्तीमुळे जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याच्या शक्तीपुढे सर्वच फेल होतात पण ते म्हणतात नवरा बाहेर कितीही शूरवीर असला तरी बायकोसमोर त्याची भित्री मांजरच बनते. असेच काहीसे दृश्ये सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडताना दिसून आले ज्यात सिंहीण गर्जना करत सिंहावर डाफरते आणि जंगलाचा राजा भित्राभागूबाई बनत तिच्यासमोर घाबरताना दिसून येतो. हे मजेदार दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून यातील सिंहाची रिॲक्शन पाहून लोकांना हसू अनावर झाले आहे.
काय घडलं व्हिडिओत?
या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, रस्त्याच्या कडेला एक मोकळे मैदान आहे. अशातच एका खड्ड्यातून सिंह धावत येताना दिसतो. यावेळी सिंहीणी त्याच्या मागे असते आणि ती त्याला मारायला त्याच्या मागे पळत असते. सिंहिणी गर्जना करत त्याचा पाठलाग करते आणि सतत त्याच्यावर हल्ला करते. तिचा राग इतका भयानक असतो की ती सिंहाला जमिनीवर फेकते. सिंहिणीचा हा राग पाहून सिंहाचा चेहरा घाबरलेला बनतो आणि तो निमूटपणे हे सर्व सहन करतो. त्याला पाहून असं वाटतं की तो मनात म्हणतच असेल की, “आलिया भोगासी काय करेलासी”. जंगलाचा बलाढ्य राजा राणीसमोर काही आपले वर्चस्व गाजवू शकला नाही आणि शेवटी एक खरा नवरा ठरला. हे दृश्य आता सोशल मीडियावर युजर्सच्या चांगल्याच पसंतीस पडले असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
His shocked face 😂😂 pic.twitter.com/WefsOe46K1
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) July 3, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती स्वप्नात पाहत होती की तो तिला फसवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने नक्कीच तीला शांत राहण्यास सांगितले असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “इथे पण महिलांचीच पॉवर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.