अद्भुत! अवकाशातून पडला बर्फाचा पांढराशुभ्र गोळा, चमत्कारी दृश्य पाहून अन् हात लावताच घडलं असं... ; Video Viral
जगात काही ठिकाणी हिवाळ्यात बर्फवृष्टी होते ज्यात बर्फाच्या गाराही अवकाशातून खाली पडताना दिसून येतात. भारतात मात्र बहुतेक ठिकाणी बर्फवृष्टी होत नाही फार क्वचित जागी बर्फवृष्टीचे दृश्य दिसून येते. पण नुकतीच वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर येथे एक आश्चर्याची घटना घडून आली. इथे बुधवारी सकाळी काही स्थानिकांना बर्फाचा एक मोठा गोळा जमिनीवर पडलेला दिसून आला, त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. संपूर्ण गाव हे दृश्य पाहण्यासाठी जमा झालं तर काहींनी आपल्या फोनच्या कॅमेरामध्ये हे दृश्य साठवून ठेवलं. याचाच व्हिडिओ इंटरनेटवरही शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे.
काय प्रकरण आहे?
अचानक जमिनीवर सापडलेल्या या बर्फाच्या गोळ्याला पाहून सर्वच थक्क झाले आणि लोकांनी संबंधित निरनिराळे अंदाज लावायला सुरुवात केली. कुणी म्हणाल ही चार किलो वजनाची गारा आहे तर कुणी ही आठ किलो वजनाची गारा आहे. हमदापूर येथील अंबादास वासनिक यांच्या शेतात ही गारा आढळून आली आहे. बुधवारी मुसळधार पावसाचा मारा सुरु असतानाच वासनिक यांच्या मुलीला त्यांच्या शेतातील गोठ्यासमोर ही मोठी गारा दिसून आली. पुढे घटनेविषयी आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांना कळताच त्यांनी लगेच गुरुवारी घटनास्थळी धाव घेतली आणि हा काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आकाशातून मोठ्या आकाराची अशा प्रकारे गार पडण्याचे प्रकार क्वचित घडतात. त्याला ‘मेगाक्रायोमीटिअर’ असे म्हणतात. मात्र, त्याकरिता लागणारी पोषक भौगोलिक परिस्थिती या घटनेच्या वेळी वर्धा जिल्ह्यात नव्हतीच.
महाराष्ट्र: वर्धा में 5 किलो वजनी ओले गिरने की चर्चा
हमदापुर निवासी अंबादास वासनिक के घर के पास 5 किलो वजनी बर्फ का गोला गिरा। इतने बड़े ओले देखकर लोग हैरान #Maharashtra #MahamaMeetsMedia #Hail pic.twitter.com/NmLFVQFW3C— Journalist Deepika singh (@Deepikasingh043) September 11, 2025
मुंबई लोकल पुन्हा चर्चेत! एका सीटवरुन वाद अन् एकमेकांच्या जीवावर उठले प्रवासी… भयानक VIDEO VIRAL
बराच तपास केल्यानंतर आणि घटनास्थळी ज्यांनी ज्यांनी ही गार पाहिली त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांनी ही गार अवकाशातून पडलीच नाही असा निष्कर्ष काढला. अशात ही गार किंवा बर्फाचा गोळा नक्की आला कुठून हे कोड मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिलं. याचा व्हिडिओ @Deepikasingh043 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल आणि शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.