काय खरं काय खोटं? महिलेने साडीला लावली आग अन् पुढच्याच क्षणी... अंगावर काटा आणणारा Video Viral
सोशल मीडियावर रील व्हायरल करण्याचे वेड आता भलतेच वाढले आहे. आजकाल प्रत्येकजण व्हायरल होण्याच्या शर्यतीत आहे. यासाठी लोक जीव मुठीत धरून निरनिराळे रिल्स बनवतात. हे रिल्स बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. व्हायरल झालेले हे व्हिडिओ अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक वाटेल ते करायला बघतात. अलीकडेच एक असाच धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला कॅमेऱ्यासमोर तिच्या साडीला आग लावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती महिला तिच्या साडीच्या पदराला आग लावून पळताना दिसत आहे. साडीला लागलेल्या आगीने काही वेळातच मोठे रूप धारण केले, हे पाहून महिला घाबरते आणि आरडाओरडा करू लागते.
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. हे व्हायरल व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला हसवतात, कधी रडवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देखील देऊन जातात. यात अनेकदा काही अपघातांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका महिलेच्या साडीला आग लागल्याचे दिसून येत आहे. आग लागताच महिला घाबरते आणि तेथून पळू लागते मात्र यावेळी एक व्यक्ती समोरून हे सर्व आपल्या कॅमेरात कैद करत असतो, ज्यामुळे आग लागल्याची ही घटना खरी आहे की शूटिंगचा एक प्रकार असा प्रश्न निर्माण होत आहे.
हेदेखील वाचा – तिकिटावरून पेटला वाद! बस कंडक्टरने प्रवाशाला सीटवर लोळवत लाथा-बुक्क्यांनी हाणलं, धक्कादायक Video Viral
महिलेचा आरडाओरडा ऐकून एक वृद्ध जोडपे तिथे आले आणि तिच्या साडीतील आग विझवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आग विझत नाही तेव्हा ती महिला लगेचच तिची साडी काढू लागते. मग ती पुढे पळू लागते. कॅमेरा घेऊन उभा असलेला एक व्यक्ती काहीही न करता हे सर्व दृश्य आपल्या कॅमेरात टिपत राहतो. या सर्व प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता ही घटना खरंच आहे की फक्त व्हिडिओसाठी असे करण्यात आले आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
यह रील की बीमारी महामारी बन चुकी है,
इस महिला जान भी जा सकती थी हद हो गई! pic.twitter.com/Nj8cf2wK5X
— Santosh Kumar (@sk90official) November 9, 2024
हेदेखील वाचा – प्रेमासाठी काही पण! बायको छतावरून खाली पडताच नवऱ्याने केलं असं… धडकी भरवणारा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @sk90official नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हा रील रोग महामारी बनला आहे, या महिलेला आपला जीव गमवावा लागला असता, हे खूप झाले!’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप आहे, मित्रा, हे प्रभु, त्यांचे जीवन धोक्यात आहे किंवा संपूर्ण पृथ्वी धोक्यात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यांना फक्त फेमस व्हायचे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.