जीव गेला तरी चालेल पण झोप मिळाली पाहिजे! ट्रेनमध्ये सीट मिळाली म्हणून तरुणाने केला जीवघेणा जुगाड; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात जे नेहमीच लोकांना हसवतात, भावूक करतात तर आश्चर्याचा धक्का देऊन जातात. तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्यास तुम्ही हे व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. इथे लोक जुगाड, स्टंट आणि कोणत्या अपघातासंबंधित अनेक व्हिडिओ शेअर करतात. रेल्वेचेही बरेच व्हिडिओ इथे व्हायरल होत असतात अशात असाच एक व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे जो इंटरनेटवर जोरदार धुमाकूळ माजवत आहे. यात ट्रेनमध्ये सीट मिळाली नाही म्हणून तरुणाने असेकाही करून दाखवले की प्रवाशांसह सोशल मीडिया युजर्सही हादरले. चला यात घडले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो ट्रेनसंबंधित आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चालू ट्रेन कोचमधील काही दृश्ये दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुण झोपण्यासाठी अनोखा जुगाड करताना दिसून आला. सीट मिळाली नाही म्हणून तरुण चक्क दरवाजाच्या टोकावर जाऊन झोपल्याचे यात दिसून आले आहे. व्हिडिओत तरुण अक्षरशः दरवाजाच्या बारीक टोकाचा आधार घेत त्यावर झोपला आहे आता विचार करा तरुणाचा जरा देखील तोल गेला तर त्याला हा जुगाड किती महागात पडू शकतो. व्हिडिओ दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या विक्रमशीला एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक १२३६८) चा आहे असे सांगितले जात आहे. तरुणाचा हा जुगाड पाहून ट्रेनमध्ये सर्वच थक्क झाले आणि तेथील एकाने हे सर्व दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला ज्याला पाहून सर्वच हादरले.
हा व्हायरल व्हिडिओ @abhii_kkashyap नावाच्या इंस्टाग्राम अकाउटंवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “लोकसंख्या कमी करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जनरल डब्यांच्या संख्येवर मर्यादा नाही; संपूर्ण ट्रेन जनरल डब्यांसह चालवावी; अतिरिक्त गाड्या चालवल्या पाहिजेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.