Girlfriend Boyfriend Jokes In Marathi Will Make You Laugh
पांचट Jokes: गर्लफ्रेंड – प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन… बॉयफ्रेंड – का? उत्तर ऐकून हास्याने लोटपोट व्हाल
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे नाते फक्त प्रेमानेच भरलेले नसते तर यात काही विनोदी संभाषणेही रंगत असतात. मिश्किल खोडी आणि हास्याने भरलेले हे विनोद तुमच्या चेहऱ्यावर खळखळून हसू आणतील, एकदा वाचा जरूर!
बॉयफ्रेंड: प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटोकडे बघत राहतो
गर्लफ्रेंड: आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर?
बॉयफ्रेंड: मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो…
बॉयफ्रेंड: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
गर्लफ्रेंड: अय्यां… खरंच.. का रे?
बॉयफ्रेंड: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…
गर्लफ्रेंड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन.
बॉयफ्रेंड: का?
गर्लफ्रेंड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन..
गर्लफ्रेंड: तू जिथे जाणार माझी सावली तुझ्यासोबत तिथे येणार?
बॉयफ्रेंड: मला तर आधीपासून ठाऊक होत की तू भूतनी आहेस
गर्लफ्रेंड: आज तुला आमच्या पप्पांनी पंचपक्वान्न जेवायला बोलवलंय
बॉयफ्रेंड: आरे आज अचानक? बहुतेक आपल्या लग्नाची बोलणी करणारेत वाटतं
गर्लफ्रेंड: नाही रे वेड्या, महाळासाठी कावळा मिळत नव्हता म्हणुन बोलवलंय…
गर्लफ्रेंड : ते जादूचे तीन शब्द बोल ना…?
बॉयफ्रेंड : ओम् भट स्वाहा
गर्लफ्रेंड : तु सिंगलच मरणार कुत्र्या…
गर्लफ्रेंड : काल माझ्या पप्पाने मला तुझ्या बाईकवरून जाताना पाहिल
बॉयफ्रेंड : अरे बाप रे!!! मग काय झालं ?
गर्लफ्रेंड : मग काय… त्यांनी मला ऑटोसाठी दिलेले पैसे रात्री परत घेतले…
गर्लफ्रेंड: बाबू! माझे दोन्ही पाय तुटले आहेत
बॉयफ्रेंड : अरेरे, कसे बाळा?
गर्लफ्रेंड: मी छतावरून पडले,
बॉयफ्रेंड: पण तू तर पापाची परी आहेस, उडून गेली असतीस…
गर्लफ्रेंड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेंड: लाँग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेंड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेंड: अरे मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झाले आहेत…