रिलचा नाद बरा नव्हे! फुग्यात कॉकरोच स्प्रे भरत तरुणाने लावली आग अन् तितक्यात तरुणासोबत घडलं भयानक... धडकी भरवणारा Video Viral
आजकालच्या डिजिटल युगात रिल्सचे प्रमाण फार वाढले आहे. स्वतःला व्हायरल करण्याच्या नादात लोक उठसूट नको ते उद्याप करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. प्रसिद्धीसाठी केलेले हे प्रयोग नेहमीच सफल होतात असं नाही बऱ्याचदा ते आपल्या अंगाशीही येऊ शकतात आणि असाच भयंकर प्रकार एका तरुणासोबत घडून आला ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्ये फार धक्कादायक असून एका रीलमुळे तरुणाचा जीव कसा धोक्यात आला हे तुम्ही यातून पाहू शकता. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका माणसाच्या हातात फुगा आणि दुसऱ्या हातात झुरळ मारण्याचा स्प्रे दिसत आहे. हा फुगा तो फुगवतो आणि नंतर त्यात कॉकरोच स्प्रे भरून घेतो. फुग्यात थोडा गॅस भरल्यानंतर तो स्प्रे आणि पाईप बाजूला ठेवतो. त्यानंतर तो लाइटर बाहेर काढून फुग्याला आग लावू लागतो. आता फुगा थोडा जळताच आतला सर्व गॅस त्या आगीच्या संपर्कात येतो आणि अचानक आगीचा एक मोठा स्फोट होतो. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लायटर पेटवताच आग कशी तरुणाच्या अंगावर येते. आगीचा हा प्रकोप पाहून तरुणही घाबरतो आणि पळतच मागे फिरतो. सुदैवाने ही आग फार सेकंदातच बंद होते ज्यामुळे तरुणाला फार काही होत नाही मात्र नको ते स्टंट जीवाला कसे धोका निर्माण करतात याची अद्दल त्याला नक्कीच घडली असेल.
रील के लिए कुछ भी करता है मेरा दोस्त 😂
कोई तो कीड़ा है अंदर में जो निकलना चाह रहा pic.twitter.com/y7xtmInsNF— Reetesh Pal (@PalsSkit) June 20, 2025
Viral Photo: कॉलेजमध्ये सापडला विचित्र सांगाडा, माणसाचे हात तर शरीर जनावराचे; पाहून डोळे विस्फारतील
तरुणाचा व्हायरल व्हिडिओ @PalsSkit नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच अनेकांनी तरुणाच्या या पराक्रमावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रीलचा किडा भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोक आपल्या जीवाशी खेळत आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “थोडक्यात वाचला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.