
अरे बापरे! फळ आहे की सोनं? 10 कोटींचा सफरचंद सर्वत्र ठरलाय चर्चेचा विषय; नक्की काय खास आहे यात?
अलीकडेच सोशल मीडियावर एका सफरचंदाची फार चर्चा होत आहे. सफरचंदाचे सेवन आपल्या आरोगयासाठीचे खूप फायद्याचे ठरते हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊकच आहे. पण हाच सफरचंद जर कोट्यवधी रुपयांना मिळत असेल तर तुम्ही तो खरेदी कराल का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक साधा सफरचंद कोट्यवधी रुपयांना का विकला जाईल पण आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा हा तर्क चुकीचा आहे. वास्तविक, बाजारात 10 कोटी रुपयांचा सफरचंद विक्रीसाठी सादर करण्यात आला आहे. आता एवढ्या किमतीच्या या फळात नक्की असं काय दडवण्यात आलं आहे ते चला जाणून घेऊया.
सफरचंदाची किंमत 10 कोटी का?
मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर रोहित पिसाळ, ज्यांना प्रेमाने “गोल्ड मॅन” म्हणून ओळखले जाते, त्यांनी एक असा पराक्रम केला आहे ज्याने सर्वच चकित झाले आहेत. कल्पना करा की कोणीतरी तुम्हाला सांगत आहे की एका सामान्य दिसणाऱ्या सफरचंदाची किंमत १० कोटी रुपये आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. पण रोहितने ही कल्पना प्रत्यक्षात घडवून आणली आहे. हा सफरचंद काही यासाधा फळ नसून त्याला सोने आणि हिऱ्यांपासून तयार करण्यात आले आहे.
या सफरचंदाला खाता येणार नाही…
सोन्याने तसेच हिऱ्याने मडवलेला हा सफरचंद खाण्यायोग्य नाही तर तो फक्त दागिन्यांच्या कलेचा एक अद्भुत उदाहरण आहे. रोहितने १८ कॅरेट सोने आणि ९ कॅरेट ३६ सेंट हिरे वापरून याला तयार केले आहे. हे सोनेरी सफरचंद अंदाजे १,३९६ लहान हिऱ्यांनी जडवलेले आहे, त्याचे तेज पाहण्याऱ्याला चकित करते. अंदाजे २९.८ ग्रॅम वजनाची, त्याची गुंतागुंतीची कारागिरी इतकी बारकाईने आहे की ती खऱ्या सफरचंदासारखी दिसते. याला फार बारकाईने तयार करण्यात आले आहे जेणेकरून ते खऱ्या सफरचंदासारखे दिसू लागेल.
मुंबई में गोल्डमैन के नाम से फेमस रोहित पिसाल ने 10 करोड़ का एप्पल बनाया है। जो बुध्द भगवान को समर्पित है। इस 10 करोड़ के एप्पल को बनाने में 18 कैरेट गोल्ड और 9कैरेट 36 सेंट के हीरो का इस्तेमाल हुआ है।#GoldRate #Apple #Mumbai pic.twitter.com/PsjFeOi58Y — Vikash Raj (@Ssrrkkaarr) November 8, 2025
हे सफरचंद खास का आहे?
रोहित पिसाळ म्हणतात की त्यांनी हे सफरचंद केवळ दागिन्यांसाठी बनवले नाही तर भारतीय कलेची प्रतिष्ठा जगासमोर आणण्यासाठी बनवले. त्यांचे स्वप्न भारताच्या पारंपारिक दागिन्यांच्या कलेला आधुनिकीकरण करणे आणि ती एका नवीन पातळीवर नेणे हे होते. त्यांचे सुवर्ण सफरचंद या स्वप्नाचे प्रतीक बनले आहे.
या अनोख्या कलाकृतीचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश करण्यात आला आहे. शिवाय, वर्ल्ड इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (WIGI) ने याला प्रमाणित केले आहे. याचा अर्थ असा की या सफरचंदात वापरलेले सोने आणि हिरे खरे आणि उच्च दर्जाचे आहेत. हे प्रमाणपत्र या कलाकृतीला आणखी खास बनवते, कारण ती केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही तर एक प्रामाणिक कलाकृती देखील आहे.
थायलंडच्या रॉयल पॅलेसमध्ये सफरचंदाचे प्रदर्शन
सोनं-हिरेजडित हे सफरचंद थायलंडच्या रॉयल पॅलेसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. परदेशी संग्राहक आणि कलाप्रेमी त्याच्या सौंदर्याने मोहित झाले आहेत. अनेकजण याला खरेदी करण्यासाठीही आतुर झाले आहेत, यासाठी लाखो रुपये देऊ केले आहेत. पण रोहित पिसाळ यांच्यासाठी, ते केवळ कलाकृती नाही तर एक भावनिक कामगिरी आहे. तो ते भारतीय कारागिरांच्या प्रतिभेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक मानतो. पैशांपुढे कला विकली जात नाही हे
रोहित पिसाळ यांनी दाखवून दिले. त्याचे हे गोल्डन अॅपल भविष्यात केवळ एक मौल्यवान कलाकृती म्हणून ओळखले जाणार नाही तर भारतीय दागिन्यांच्या डिझाइनच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय म्हणून देखील कोरले जाईल.