(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये नेता त्याच्या काही कार्यकर्त्यांसोबत स्टेजवर उभा असतो. तो भाषण करतो आणि मग आपली झोळी पसरून समोर उपस्थित असलेल्या लोकांकडे मतांची भीक मागतो. मतांसाठी त्याने केलेली ही पद्धत पुढे जाऊन त्याच्यावरच उलटते आणि एक वृद्ध व्यक्ती त्याच्या झोळीत येऊन 1 रुपयांचं नाणं आणून टाकतो. वृद्ध व्यक्तीची ही कृती सर्वांनाच थक्क करते आणि त्याचवेळी चेहऱ्यावर हसूही आणते. नेत्याची किंमत 1 रुपयांमध्ये मोजली गेली हे पाहून त्याला राग अनावर झाला आणि ते झोळीत टाकलेले हे नाणे लगेच फेकून दिले. ही सर्व घटना तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि लगेच याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला. घटनेतील ही दृश्ये पाहून फक्त युजर्सनाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू फुटलं.
हा व्हिडिओ @laughtercolours या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काका 10 रुपये टाकायला हवे होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आधी ते मत मागतात, पैसे मागतील, जर पैसे दिले नाहीत तर ते घर आणि दुकाने पाडतील.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिहारमध्ये आयुष्य हे पंचायत सिरीजसारखे झाले आहे, बरोबर?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






