Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

Video Viral : हेच खरे नायक... ! जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावले अन् जवानांच्या तत्परतेमुळे रेल्वे रुळावरील मोठा अपघात टळला. ही घटना सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून व्हिडिओच्या शेवटी ट्रकचालक देवदूत बनून आलेल्या जवानांचे आभार मानताना दिसून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 01:39 PM
रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे ट्रॅकवर अडकला अवजड ट्रक.
  • जवानांनी वेळीच धाव घेत ट्रक हटवला.
  • तत्परतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला.
देशाचे जवान फक्त सीमेवरील लढाईत आपले शाैर्य दाखवत नाहीत तर कठीण प्रसंगी सामान्य जनतेचेही रक्षण करायला ते तत्परतेने धाव घेतात. याचेच एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रेल्वेच्या ट्रॅकवर एक भलामोठा ट्रक अडकल्याचे दिसते. अशा परिस्थितीत रेल्वेतील प्रवासी आणि ट्रकचालक दोघांचा जीव टांगणीला लागला होता. इतका मोठा ट्रक रेल्वे रुळावरुन हटवायचा कसा आणि हा अनर्थ टाळायचा कसा असा प्रश्न मनात घोंघावत असतानाच जवानांची एक टीम मदतीसाठी धाव घेते.

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

देवदूत बनले जवान

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत जवानांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळल्याचे दिसते जे पाहून सर्वजण त्यांच्या हिंमतीची प्रशंसा करु लागतात. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात जवानांचा एक मोठा गट रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या ट्रकला रुळावरुन पुढे ढलकत बाहेर काढताना दिसून येतात. समोरुन रेल्वे आली तर सर्वांचा जीव धोक्यात येऊ शकतो ही भावना मनात ठेवून प्रत्येक जवान आपली सर्वोतपरी ताकद लावून मोठ्या शर्तीने ट्रकला रेल्वे रुळावरुन पुढे ढकलण्याचे प्रयत्न करतो. काही वेळानंतर या कामात ते यशस्वी होतात आणि ट्रक रुळाच्या बाहेर पूर्णपणे ढकलला जातो. व्हिडिओच्या शेवटी ट्रकमालक हात जोडून जवानांचे आभार मानताना दिसतो. ही मदत त्याच्यासाठी फार मोठी असते.

वेळीच जवान जर घटनास्थळी पोहचले नसते तर ट्रक आणि रेल्वेचा अपघात होण्याची शक्याता होती. यामुळे फक्त ट्रकचेच नाही तर रेल्वे आणि रेल्वेतील प्रवाशांचेही मोठे नुकसान होऊ शकले असते. या घटनेचा व्हिडिओ @Alpakanya नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे. भारतीय लष्कराच्या १० व्या बटालियनचे क्यूआरएफ (QRF) जवान कर्तव्यासाठी दमोहच्या दिशेने जात होते. यावेळी, त्यांना रेल्वे रुळावर एक अवजड ट्रक उभा असलेला दिसला आणि त्यांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली.

A railway accident was averted in Sagar, MP due to quick presence of mind of Indian Army Jawans. QRF personnel of the 10th Battalion who were heading towards Damoh for duty, saw a stalled truck on the railway track and rushed to help. They pushed the heavy truck away from the… pic.twitter.com/z9x6YkXet3 — Alpakanya (@Alpakanya) August 10, 2026

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

सोशल मिडियावर सध्या ही घटना चांगलीच व्हायरल होत असून यूजर्स जवानांच्या तत्परतेचे मन भरुन काैतुक करत आहेत. काहींनी लिहिले आहे की, ‘जवानांनी केवळ आपले कर्तव्यच बजावले नाही, तर वेळेवर आपली जबाबदारी ओळखून अनेकांचे प्राण वाचवले’. एका यूजरने म्हटले की, “पण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल त्या चालकाला कायद्यानेही समज दिली पाहिजे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपल्या सैनिकांना सलाम”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे पाहून खूप अभिमान वाटतोय आणि मन भरून आलं आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Army soldiers remove heavy truck stuck on railway track viral video madhya pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • indian Soldiers
  • madhya pradesh
  • Video Viral

संबंधित बातम्या

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
1

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
2

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
3

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
4

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.