प्रपोज करताच मागून झाला ज्वालामुखीचा उद्रेक जणू सृष्टीनेच दिला होकार, निसर्गाचे अद्भुत दृश्य अन् अनोख्या प्रपोजलचा Video Viral
प्रेमाचा प्रवास सुरु करायचा तर प्रेम व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. हा गोड क्षण अनेकजण कॅमेरात कैद करून ठेवतात जेणेकरून या क्षणाच्या आठवणी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहतील. अनेकजण हा क्षण सोशल मीडियावर देखील शेअर करतात. अशात नुकताच एका सुंदर आणि निसर्गमय प्रपोजलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात व्यक्तीने आपल्या प्रेयसीला प्रोपोज करताच निसर्गाचा असा अद्भुत चमत्कार दिसून आला की हा गोड क्षण आणखीनच अविस्मरणीय ठरला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
जस्टिन ली आणि त्याची गर्लफ्रेंड मॉर्गनचा यांचा हा व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी जस्टिनने ग्वाटेमालाचा अकाटेनांगो ज्वालामुखीच्या जवळील परिसर निवडला आणि तिथे गुडघे टेकून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. व्हिडिओमध्ये दोघेही एका खुल्या जागी पोज देत असतात आणि याचवेळी जस्टिन मॉर्गनला अचानक प्रपोज करतो. त्याचे हे प्रोपोजल मॉर्गनसाठी सप्राइज असते ज्यामुळे ती हे पाहताच आधी अचंबित होते. तिच्या चेहऱ्यावरील आनंद व्हिडिओत स्पष्ट दिसून येतो. ती अंगठीला हातात पकडायला जाते आणि तेवढ्यात मागील फ्यूगो ज्वालामुखीचा अचानक उद्रेक होतो. लावा आणि धुराने अवकाशात अनोखे दृश्य दिसून लागते जे पाहून मॉर्गनही आश्चर्यचकित होते. निसर्गाचा हा चमत्कार या क्षणाचा गोडवा आणखीनच वाढवतो आणि हे सर्व दृश्य कॅमेरात कैद होते. हे दृश्य कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटतं नाही ज्यामुळे कमी वेळातच हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरतो.
हा व्हायरल व्हिडिओ @missmorganalexa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ज्वालामुखीही तुमच्यासाठी उत्सुक होता! आहाहा, मला हे खूप आवडले!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वीज, लावा, प्रेम, प्रश्न, उत्तर, हे सर्व अगदी परिपूर्ण आहे ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला हे तुझ्यासाठी खूप आवडले, पुन्हा एकदा अभिनंदन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.