Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

Heart Touching Video : संकटात मुलाची ढाल बनली अन् वर्दळीच्या रस्त्यावर आपल्या पिल्लाचे केले रक्षण. मादी श्वानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्यांनी युजर्सना अश्रू अनावर केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 09:11 AM
शेवटी आईच ती...! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं... Video Viral

शेवटी आईच ती...! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • जखमी पिल्लाचे रक्षण करण्यासाठी आईने स्वतःचा जीव धोक्यात घालत वाहनांसमोर उभे राहण्याचा धाडसी निर्णय घेतला.
  • आई कुत्रीची तळमळ पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी मार्ग बदलत संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच हजारो नेटकऱ्यांनी ‘आईचे प्रेम’ म्हणत भावनिक प्रतिक्रिया नोंदवल्या आणि मानवतेवरही प्रश्न उपस्थित केले.
या जगात जितकं प्रेम आपल्यावर आपली आई करते तितकं प्रेम इतर कुणीही करु शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. कोणत्याही स्वार्थाशिवाय आई आपल्या मुलाला जपते, प्रत्येक संकटापासून त्याचे संरक्षण करते. आईचे हे प्रेम फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तितक्याच प्रकर्शाने दिसून येते. अलिकडे असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक मादी कुत्री आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून एका बससमोर उभी राहताना दिसून आली. आपल्या मुलासाठी तिने उचलले हे पाऊल काैतुकास्पद असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर यूजर्सना आईचे महत्त्व नव्याने समजावून सांगत आहे. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.

70 वर्षांच्या पाकिस्तानी हकीम बाबरने केलं 22 वर्षांच्या तरुणीशी लग्न… म्हणाला, “मी अल्लाहची ऑर्डर फॉलो करतोय”; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक पिल्लू रस्त्यावर पडलेलं आहे, जे गंभीर जखमी आहे. अशा परिस्थितीत एक कुत्री तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली आहे. असं करून ती रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना त्यांचा मार्ग बदलण्यास भाग पाडत आहे. कुत्रीची ही कृती पाहून, त्या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक वाहनचालक आपला मार्ग बदलतो ज्यामुळे पिल्लाच्या अंगावरुन एकही गाडी जात नाही. ती कुत्री त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत असे करत आहे. पिल्लू रस्त्यावर घायळ होऊन पडलेला असतो आणि त्याच्या संरक्षणासाठी आई धोका पत्कारुन गाड्यांपासून त्याचे रक्षण करत असते. हे दृष्य प्राण्यांमधील निस्वार्थी प्रेम आपल्याला दाखवून देते. आपल्यासाठी धोका पत्करणारी आपली आईच असू शकते आणि हे त्याचेच सार्थ उदाहरण आहे.

On a busy Indian road, a fearless mother dog stood against speeding vehicles, risking everything to save her injured puppy 🥹 pic.twitter.com/gkT1LO4kXH — Vishal (@VishalMalvi_) February 24, 2026

याला म्हणतात रॉयल डिलिव्हरी! पाठीवर ब्लिंकिंटची बॅग अन् घोड्यावर बसून ताऊ करू लागले डिलिव्हरी; मजेदार Video Viral

हा व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका वर्दळीच्या भारतातील रस्त्यावर, एका निर्भय आई कुत्र्याने वेगवान वाहनांसमोर उभे राहून तिच्या जखमी पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घातले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे आईचे प्रेम आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ बनवू शकतो पण मदत करू शकत नाही, व्वा, मानवतेचे हे किती उत्तम उदाहरण आहे!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भारतीय रस्ते कोणासाठीही सुरक्षित नाहीत आणि अशा प्रकारचे रील पाहून खूप वाईट वाटते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral dog mother stood in front of the car as a shield to save the puppy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • dog viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral
1

काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने, जंगलातील प्राणी समोरोसमोर येताच जे घडलं… Video Viral

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral
2

“मी पण कुणाचा तरी बाप आहे”, ऑटोचालकाने रिक्षात लिहिलं असं काही की… क्षणात व्हायरल झाला मेसेज; Video Viral

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral
3

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video
4

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.