काकू एक्सट्रा ऑर्डीनरी निघाल्या, बाईकवर बसताच काकांवर केला बुक्क्यांचा मारा... लोक म्हणाले "विषय जरा जास्तीच हार्ड ए"'; Video Viral
सोशल मिडियावर तुम्ही अनेकांना बाईकवर स्टंट करताना पाहिले असेल. पण यावेळी खरोखरचं एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात असे काही दृश्य दिसून आले जे पाहून सर्वांना हसू अनावर झाले. व्हिडिओमध्ये एक काकू आणि काका बाईक सवारी करत असल्याचे दिसते. परंतु, काही क्षणातच हे दृश्य पालटते आणि काकू चालू गाडीवरच काकांची धुलाई करु लागतात. व्हिडिओमध्ये वाजवलेले रोमँटिक गाणे व्हिडिओच्या वास्तवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तथापि अनेक यूजर्सने यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दिल्ली नंबर प्लेट असलेली एक बाईक पुढे जात आहे ज्यावर एक महिला आणि एक पुरूष स्वार आहेत. अचानक, काकू कशावर तरी रागावतात आणि काकांना बुक्क्यांनी बेदम मारहाण करु लागतात. काका मात्र यावर काहीच प्रतिक्रिया करत नाहीत आणि निमूटपणे गाडी चालवत राहतात. हे मजेदार दृश्य पाहून आता सर्व कपल्स याला आपल्या आयुष्याशी जोडू पाहत आहेत आणि याची मजाही लुटत आहेत. व्हिडिओमध्ये ‘ये वादा रहा’ हे आयकॉनिक बॉलीवूड गाणे देखील वाजवले आहे, जे व्हिडिओतील परीस्थितीशी अजिबात जुळताना दिसून येत नाही. व्यक्तीगत असलेली ही बाब उघड्यावर आल्याने लोकांनी त्याच हस बनवलं, काहींनी काकांची बाजू घेतली तर काहींनी काकांनी काहीतरी खोडसरपणा केला असावा म्हणत काकूंच्या कृतीचे समर्थन केले.
हा व्हायरल व्हिडिओ @raopranjalyadavv नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी आणि माझा नवरा पण असेच आहोत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही प्रेमाची व्याख्या नाहीये, मला समजत नाही की लोक याला प्रेम कसं मानतात.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे घरगुती हिंसाचार नाही का? तुम्हाला हे सर्व रोमँटिक किंवा काळजी घेणारे कसे वाटते?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.