(फोटो सौजन्य: Facebook)
सोशल मिडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि आपल्याला आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे माणसांचेच काय तर प्राण्यांचेही बरेच व्हिडिओज शेअर केले जातात. अशातच आता इंटरनेटवर नुकताच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात गजराज म्हणजेच एक विशालकाय हत्ती एका लहान बकरील आपल्या पायाखाली चिरडताना दिसून आला. एखाद्या पापडाप्रमाणे यात बकरीची दयनीय अवस्था झाली जे पाहून सर्वांचेच हृदय पिळवटून निघाले. मृत्यूचा हा थरारक व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, अनेक यूजर्सने आता बकरीच्या अवस्थेविषयी हळहळ व्यक्त केली आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक हत्ती शहरातील रस्त्यावरून चालताना दिसून येत आहे. यावेळीच बकऱ्यांचा एक कळप देखील तिथे उपस्थित असतो. हत्ती कळपाजवळून जात असताना, अचानक एक बकरी हत्तीसमोर येते, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे हत्ती आपला रस्ता बदलत नाही आणि समोर आलेल्या बकरीला आपल्या पायांनी चिरडत तो पुढे निघून जातो. एखाद्या पापडाला चिरडावं अशाप्रकारे बकरीला हत्ती चिरडतो, जे पाहून सर्वांचे हृदय हेलावून जाते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की बकरीवर पाय पडताच तिचा तिथेच शेवट होतो. व्हिडिओ इतका भयानक आहे की कॅमेरामन उर्वरित दृश्य दाखवण्यापूर्वीच कॅमेरा बंद करतो. यूजर्स मात्र आता बकरीच्या या दयनीय मृत्यूवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
असा मृत्यू नकोच रे बाबा! ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @Anis Khan नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हत्ती असं मुळातच करु शकते नाही, हा एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारी बकरी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांच्या या वर्तनामुळेच त्यांना प्राणी म्हटलं जातं आणि माणसांमध्ये हे वर्तन आलं तर तेही प्राणा म्हणवले जातील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.