संपूर्ण नाग समाज घाबरलेला आहे... ! काकूंचे हे वर्तन पाहून तुमचाही थरकाप उडेल; Viral Video
तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे व्हायरल होणारे व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील. इथे अनेक विचित्र आणि थक्क करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जातात. आताही इथे एक अशीच गोष्ट व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्ये पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक काकू चक्क नागराजाला हातात घेऊन एका माळेप्रमाणे आपल्या गळ्यात मळताना दिसून येत आहेत. हा सर्व प्रकार फार धोकादायक आणि धक्कादायक आहे, लोक आता ते पाहून थक्क झाले आहेत आणि वेगाने व्हिडिओ शेअर करत आहेत. चला यात नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
नाग मुळातच एक विषारी आणि धोकादायक प्राणी आह, त्याच्या विषारी दंशाने तो भल्याभल्यांना मृत्यूच्या दारी नेऊन सोडतो. अशात सापापासून अनेकजण आधीपासून चार हात लांब राहतात. अहो, माणसंच काय तर प्राणीही सापाला पाहून आपली वाट बदलतात, यावरून तुम्ही त्याची दहशत ओळखू शकता. मात्र सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सर्वत्र खळबळ उडवून टाकली आहे. यातील काकूंचे साहस पाहून लोक थक्क झाले आणि संपूर्ण नाग समाज आता काकूंना घाबरत असेल अशी प्रतिक्रिया लोक देऊ लागलेत.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला नदी किंवा तलावाच्या काठावर पूजा करत असताना एक लांबलचक साप तिथे येतो, हे पाहून काकू घाबरल्या नाहीत तर तो आपल्या हातात घेतात आणि हाताने नमस्कार करू लागतात. मग पुढे जे होते ते सर्वांनाच थक्क करून जाते, ती महिला आपल्या गळ्यात साप गुंडाळू लागते. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक हे मोठ्या प्रमाणावर एकमेकांशी शेअर करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @log.kya.sochenge नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भारत नवशिक्यांसाठी नाही’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून लाखोंनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत, तसेच काहींनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा नाग नागिणीला भेटतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती स्त्री आहे ती काहीही करू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.