(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेकदा आपल्याला थक्क करून जातात, कारण यात बरेच असे प्रकार दाखवले जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आताही इथे एका धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक व्यक्ती थेट मृत्यूलाच खुले आव्हान देताना दिसून आला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, नक्की यात असं काय झालं…? चला तर मग यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी झोपल्याचे दिसून येते. यानंतर अचानक एक हायस्पीड ट्रेन त्याच्या अंगावरून जाते, जे अनेकांचे श्वास रोखून धरते. हे दृश्य खरोखरच भीतीदायक आणि धक्कादायक आहे. लोक ते पाहून आवाक् झाले असून आता हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे.
व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की तो माणूस रेल्वे रुळाच्या मध्यभागी अडकला होता. यावेळी आता तो मारतोय की काय असेच सर्वांना वाटू लागते. परंतु अचानक व्यक्तीला त्यावेळी सद्बुद्धी सुचते आणि त्याला ट्रेन आल्याचे समजताच तो रेल्वे रुळावर खाली झोपतो जेणेकरून तो वाचू शकते. सुदैवाने त्याची ही युक्ती कामी येते आणि या अपघातातून तो सुखरूप बाहेर पडतो. व्यक्ती कसा तरी ट्रेनच्या रुळांमधून बचावला जातो जे पाहणं फार रोमांचक ठरत. हे कधीही न पाहिलेलं दृश्य आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे, लोक ते पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
Guy stuck under a moving train escapes between its rails 😳 pic.twitter.com/LG9iXylBjk
— I Post Forbidden Videos (@WorldDarkWeb) October 25, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @WorldDarkWeb नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘चालू ट्रेनखाली अडकला माणूस’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून लोक आता कमेंट्समध्ये यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यार तो वेडा आहे का, त्याने ट्रेन जाईपर्यंत का वाट पाहिली नाही?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ट्रेनच्या शेवटी एक फलक आहे ज्यामुळे त्याला फटका बसू शकतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.