आई शेवटी आईच असते! पिल्लासाठी वाघाशी लढली अन् जंगलाच्या राजाला असं पळवलं... लढतीचा थरारक Video Viral
जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख आहे. आपल्या बलाढ्य शक्तीने आणि ताकदीने तो भल्याभल्यांची शिकार करतो आणि त्यांना मृत्यूच्या दारी पोहचवतो. अशात जंगलातील सर्वच प्राणी त्याला घाबरून असतात. मात्र सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात जंगलाच्या या राजाची एका आईने हवा टाईट केल्याचे दिसून आले. जगात कुणी आपल्यावर निस्वार्थी प्रेम करत असेल तर ती म्हणजे आपली आई असते. ममतेने भरलेली ही आई जेव्हा आपल्या मुलावर संकेत येते तेव्हा एक ढाल बनून त्याचे रक्षण करू पाहते आणि व्हिडिओतही असेच काहीसे दृश्य दिसून आले. चला नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
पांचट Jokes : कैद्याची शेवटची इच्छा… ऐकून हवालदारही चक्रावला; वाचाल तर हसून हसून पागल व्हाल
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक अस्वल सिंहाशी लढाई करताना दिसून आले आहे. खरं तर घडलं असं की, सिंहाने अस्वलाच्या पिल्लावर हल्ला केला होता आणि तो चिमुकल्या अस्वलाची शिकार करू पाहत होता मात्र तितक्यात त्याची आई त्याला वाचवण्यासाठी येते आणि आपल्या बाळाच्या रक्षणासाठी ती सिंहाशी दोन हात करू पाहते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात मादी अस्वल सिंहाशी लढताना दिसत आहे तर तिचे बाळ तिच्यामागे घाबरून हे सर्व पाहताच आणि आईच्या मागे लपून सिंहाची वाचण्याचा प्रयत्न करत आहे. मुलावर हल्ला केल्याचे जाणवताच आई रौद्र रूप धारण करून सिंहाशी अशी लढते की ते पाहून सिंहही हादरतो आणि तेथून आपला पळ काढतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सिंह जंगलात पळून जाताना दिसतो आणि इथेच व्हिडिओचा एक चांगला शेवट होतो.
pic.twitter.com/YaoMLGDIEx — THE WILD ANIMALS (@TheWildAnimal_) July 6, 2025
अस्वल सिंहाच्या या लढतीचा व्हिडिओ @TheWildAnimal_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती आई आहे, ती आपल्या मुलासाठी काहीही करू शकते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “फार सुंदर शेवट आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.