
भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दोन तरुणी, एका रिक्षाचालकासोबत वाद घालताना आणि त्याला मारताना दिसून येतात. मुख्य म्हणजे, रिक्षाचालकही मागे हटत नाही आणि तोही आपल्या बाजूने दोन्ही महिलांवर हल्ला चढवतो.ही घटना पुढे इतकी वाढते की लोकांना या हस्तक्षेप घ्यावा लागतो. रस्त्यावर उपस्थित एक महिला या वादात पडते आणि दोन्ही पक्षांना शांत करत हे भांडण रोखण्याचा प्रयत्न करते. पुढे ही घटना पोलिसांपर्यंत पोहचते ज्यानंतर महिला आणि रिक्षाचालक दोघांनाही चाैकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले जाते.
ऑटो चालकाने दावा केला की, दोन्ही महिलांनी गंतव्यस्थापर्यंत पोहचल्यानंतर रिक्षाचालकाला भाडं देण्यास नकार दिला. यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि मग या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. चालकाने असेही सांगितले की, दोन्ही महिला यावेळी मद्यापानाच्या नशेत होत्या. त्यांनी फक्त भाडं देण्यास नकार दिला नाही तर रिक्षाचालकाला शिव्याशाप देण्यासही सुरुवात केली. रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मग उत्तरात रिक्षाचालकाने त्यांच्यावर हात उचलला. दरम्यान दोन्ही महिलांनी चाैकशीसाठी पोलिस ठाण्यात येण्यास नकार दिला असून त्यांनी काही दिवसांची मुदत मागून घेतली आहे. दोन्ही पक्षाच्या बाजू समोर आल्याशिवाय या प्रकरणात नक्की कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवता येणार नाही.
Kalesh b/w a Group of Girls and Auto Driver over Fare issues, HSR Layout Bengaluru pic.twitter.com/gNAxhfVs93 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 29, 2026
हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “त्या रिक्षाचालकाला रस्त्यावर कपडे काढून मारायला हवं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बंगळूरमधील उद्धट ऑटोचालकांचे हे वास्तव आहे. मी अशी प्रकरणे पाहिली आहेत, जिथे ते ज्येष्ठ नागरिकांशीसुद्धा उद्धटपणे वागतात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं दोन्ही बाजू ऐकाव्या लागतील”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.