(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चीनमधील ग्वांगझू येथील लिंगनान इम्प्रेशन पार्कमध्ये एका स्टंट शो दरम्यान घडून आली. सांगितले जात आहे की, स्टंट सादर करणाऱ्या महिलेचे रिंगवरील नियंत्रण सुटले आणि हात निसटताच ती ३० फूट उंचीवरून खाली जमिनीवर जाऊन आपटली. या घटनेनंतर, त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, या घटनेत त्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
महिला अचानक उंचावरुन खाली कोसळल्याने सर्वत्र एकच गोंधळ सुरु झाला. शो पाहायला आलेल्या लोकांच्या किंकाळ्या फुटल्या तर त्यांना काही समजेल याआधीच महिला जमिनीवर निपचित पडली होती. महिला खाली कोसळताच काही लोक तिला मदत करण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेताना दिसून येतात. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.
चीन से दिल दहला देने वाला हादसा , चीन के ग्वांगझू में लिंगनान इंप्रेशन पार्क में एक स्टंट शो के दौरान महिला रिंग से अनियंत्रित होकर 30 फ़ीट की ऊँचाई से जा गिरी , इस घटना के बाद महिला को तुरंत हॉस्पिटल में एडमिट कराया गया , दुर्भाग्य से इस घटना के बाद महिला की टांग टूट गयी ,… — Nargis Bano (@Nargis_Bano78) September 28, 2026
या घटनेचा व्हिडिओ @Nargis_Bano78 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “जेव्हा असे धोकादायक काम केले जाते, तेव्हा खाली सुरक्षा उपाययोजना असायला हव्यात. जर खाली खड्डे खोदले असते, तर कदाचित त्याला इजा झाली नसती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक अत्यंत भयानक अपघात होता. सुदैवाने ती वाचली; ती लवकर बरी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फारच दुःखद अपघात होता”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






