अरे बाळा खेळणं नाही अजगर आहे तो...! मुंडकं फिरवलं, शेपटीवर बसला अन् विषारी प्राण्याला चिमुकल्याने केलं हैराण; Video Viral
जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये अजगर अग्रस्थानी आहे. आपल्या भल्यामोठ्या शरीराने तो माणसांना गिळायलाही मागे पुढे बघत नाही. मागेच अजगराचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्याने एका मुलाला गिळून टाकल्याची घटना घडून आली होती. अजगराचे अनेक थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. व्हिडिओतील हे दृश्य थरारकतेने भरलेले असतात पण आता मात्र अजगराचा एक अनोखा आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये एक चिमुकला चक्क अजगारासोबत खेळताना आणि त्याला त्रास देताना दिसून आला. एका खेळण्याप्रमाणे मुलगा अजगराच्या अंगावर इकडून तिकडून बागडू लागतो आणि पाहून सर्वांचाच श्वास रोखला जातो. चला व्हिडिओत काय घडलं यावीषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात रस्त्यावर एक भलामोठा अजगर पड्ल्याचे दिसून येत आहे आणि यातच लोकांना आश्चर्य करणारे दृश्य ही झळकत आहे ज्याने सर्वांचे लक्ष व्हिडिओकडे खेचून घेतले. व्हिडिओमध्ये अजगर एकटा नसून यावेळी त्याच्यासोबत एक चिमुकला व्हिडिओत दिसून येत आहे. चिमुकला अजगराजवळ जातो त्याचा फणा पकडत त्याला खेचण्याचा प्रयत्न करतो. पुढे चिमुकला अजगराच्या विळख्यात अडकल्याचेही यात दिसते पण तरीही यातून बाहेर पडत तो पुन्हा त्याच्या तोंडाजवळ जातो आणि त्याचा फणा पकडत त्याला मागे फिरवण्याचा प्रयत्न करतो. मुलाची ही दहशत आता युजर्सना अवाक् करत असून एवढं सगळं होऊनही अजगराचं चिमुकल्याला काहीही न करणं व्हिडिओची लक्षवेधी बाब ठरत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “..आणि पालक हे शूट करत आहेत??” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला सापाची जास्त दया येतेय, मला खात्री आहे की तो याने कंटाळून गेला असेल ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटत नाही की त्या अजगराला खेळायचे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.