Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात. जे पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडिओंमध्ये असं काही पाहायला मिळेल असा विचारही तुम्ही करू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ लग्नाचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नात रसगुल्ला खायला घालताना वधू आणि वर भांडताना दिसत आहेत.
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022
वधू-वरांमध्ये जोरदार भांडण
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वासच बसत नाहीये. कदाचित असा व्हिडिओ तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सही आवाक् झाले आहेत. लग्नादरम्यान वधू आणि वराच्या कुटुंबीयांमध्ये वाद-विवाद होणं हे काही नवीन नाही. त्याच्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात वधू आणि वर भांडत असल्याचा व्हिडिओ कधी पाहिलाय का? या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं तेच दिसत आहे.
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022
वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, वर आपल्या नववधूला रसगुल्ला खाऊ घालू लागतो. मात्र, वधूला रसगुल्ला खायचा नसतो. यानंतर काही वऱ्हाडी बळजबरी करू लागतात. हे पाहून वधूच्या संयमाचा बांध फुटतो. यानंतर ती वराचा हात ढकलून सर्वांसमोर त्याच्या कानशिलात लगावते. यानंतर मंचावरच वधू-वरांमध्ये जोरदार भांडण सुरू होते. व्हिडिओ पाहून तुम्हाला असे वाटेल की, WWE मध्ये दोन रेसलर लढत आहेत. ते बराच काळ एकमेकांशी भांडत आहेत. हा व्हिडिओ ‘घर के कलेश’ नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ खरा आहे की एखाद्या नाटकाचा भाग आहे, हे सध्या तरी कळू शकलेले नाही.






