दूध समजून विदेशी तरुणाने प्यायली भांग, म्हणाला भारतात कधीही... हॉस्पिटलमधील धक्कादायक Video Viral
भारताचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि येथील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी दूरदूरवरून लोक भारतात येत असतात. अनेक विदेशी लोक भारताचा दौरा करत असतात. देशात फिरताना ते येथील खाद्यपदार्थांची चव घेऊ पाहतात. मात्र अनेकदा गोष्टी हव्या तशा घडत नाहीत. विचार न करता कोणतीही गोष्ट खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते. सध्या अशीच एक विचित्र घटना विदेशी पर्यटकासोबत घडली आहे.
सध्या एका विदेशी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. हा तरुण भारतभ्रमंतीवर आला असताना त्याने मोठ्या उत्साहाने रस्त्यावरील एका दुकानातून भांगेचे सेवन केले. मात्र भांगेचे सेवन करणे त्याला चांगलेच महागात पडले. भांग पिल्यानंतर त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या की तो थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आता तुफान व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – “फ्लिपकार्टवरून मागवलेले मोदीजी”, मोदीजींच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, जाणून घ्या यामागचे सत्य
माहितीनुसार, ही घटना ज्या तरुणासोबत घडली तो एक विदेशी ट्रॅव्हल व्लॉगर आहे. तो जगातील विविध देशांची भ्रमंती करत असतो. म्हणजेच तो विविध देशांमध्ये जाऊन तिथली संस्कृती जाणून घेतो आणि आपले अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करतो. यावेळी तो भारतात आला होता. देशात फिरत असताना त्याने रस्त्यावर भांगेचे दुकान दिसले. खरं तर त्यानं केलेल्या दाव्यानुसार तो भारतीय स्ट्रीट फूड एक्सप्लोर करत होता.
या विदेशी तरुणाला या भांगेच्या दुकानात दुधामध्ये कसलातरी पाला टाकत असल्याचे दिसून आले. मग काय, उत्सुकतेपोटी तो दुकानात गेला आणि त्याने ही भांग दूध समजून प्यायली. दुकानदाराला इंग्लिश काही येत नव्हतं पण त्यानं तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये हे फिंगर मिल्क आहे असे सांगितले. तरुणाने याचा एक ग्लास प्यायला. त्याला याची चवही आवडली मात्र दुसऱ्याच क्षणी ला गरगरू लागलं. पोटात दुखु लागलं. आणि शेवटी तो चक्कर येऊन खाली पडला.
हेदेखील वाचा – मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य
हा व्लॉगर शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमीट केले होते. यांनतर त्याने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, भारतात कधीही रस्त्यावर दूध पिऊ नका. त्यामुळे तुमच्या पोटात दुखू शकतं, चक्कर येऊ शकते आणि उलट्या सुद्धा होऊ शकतात.
हा व्हायरल व्हिडिओ @sampepper नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 65 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला मात्र या भारतीय युजर्सने यावर आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. कुठलीही गोष्ट पिण्यापूर्वी किमान तो काय पदार्थ आहे हे तरी विचारण्याची तसदी त्याने घ्यावी असा सल्ला नेटकरी त्याला देत आहेत.