सोशल मीडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक हास्यास्पद तर काही आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडिओज असतात. हे व्हिडीओज युजर्सचे मनोरंजन करण्याचे काम करतात. लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडते आणि यामुळेच बऱ्याचदा हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. या व्हिडिओमध्ये अनेकदा AI जेनेरेटेड व्हिडिओचाही समावेश असतो.
सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोंदीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका हुबेहूब आहे की अनेकांना हा व्हिडिओ AI जेनेरेटेड असल्याचे वाटत आहे. मात्र असे नसून हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या माणसाचा आहे. आता प्रश्न असा पडतो की नरेंद्र मोदींसारखा दिसणाऱ्या हा व्यक्ती आता आहे तरी कोण? चला जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य
माहितीनुसार, व्हिडिओमध्ये झळकणाऱ्या व्यक्तीचे नाव विकास महंते असे आहे. ते एक प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक आहेत. ते सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. ते दिसायला हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे आहेत. शिवाय त्यांचा पेहराव आणि बोलण्याची शैली, चालण्यातला स्वॅग सर्वच काही मोदींसारखं आहे. त्यामुळेच ते कोणत्याही कार्यक्रमाला गेले की मोदीच आल्याचा भास सर्वांना होऊ लागतो. या व्हिडीओमध्ये देखील तसाच काहीसा प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा – आजोबा जोमात पाहणारे कोमात! चालू ट्रेनमधील आजोबांचा हा प्रकार पाहून सर्वच थक्क, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @viralbhayani नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 17 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओला लाइक्सदेखील दिलेले आहेत. काहींनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियादेखील मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे हे तर फ्लिपकार्टवरून मागवलेले मोदीजी जिसताहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नकलेंद्र मोदी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सेम टू सेम”. तसेच अनेकांनी महंते यांना नरेंद्र मोदींचा डुप्लीकेट असल्याचे म्हटले आहे.