'चकली की चकला', भावाने बनवलेली चकली पाहून बहिणीने धू धू धुतला...; पाहा मजेशीर व्हिडिओ
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, तर कधी स्टंट व्हिडिओ, कधी जुगाड तर कधी भांडणाचे व्हिडिओ आपण पाहतो. तसेच एकादा सण आला ती त्यासंबंधी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता दिवळीला सुरीवात झाली असून तुम्ही या संबंधी अनेक व्हिडिओ पाहिले असतील. दिवाळी म्हणले की घराची साफसफाई आणि फराळ बनवण्यास एक महिना आधीच सुरूवात होते.
दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरोघरी चिवडा, लाडू, चकली यासारखे पारंपरिक फराळ बनवण्याचा धुमधडाका सुरू होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हायरल व्हिडिओने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या व्हिडिओमध्ये एक मजेदार दृश्य दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये एक बहीण तिच्या भावाला चकली बनवायला सांगते. पण तो अशी चकली बनवतो की, पाहून बहिणीला हसू आवरत नाही पण ती असे काही करते की पाहून तुमचे हसू आवरणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बहिण भावाला चकली बनवायला सांगून काहीतरी काम करायला जाते. त्यांनतर सुरुवातीला उत्साहात चकली बनवयला लागलेला भाऊ चकली बनवत राहतो. पण त्याला माहित नसते की चकलीचा एक छोटा आकार झाला की ते पीठ स्वत: हाताने तोडायचे असते. तो चकली बनवतच राहतो. आणि इतकी मोठी चकली बनवतो की, बहिणीने हे पाहिल्यावर भावाला मजेदार टोमणे देते. ती त्याला विचारते, ‘चकली बनवली की चकला?’ भाऊ मोठ्या ‘चकली तुटणार नाही म्हणून एवढी मोठी बनवली’ असे उत्तर देतो. मात्र बहिणीचा संताप वाढतो, आणि मजेच्या सुरात असलेल्या भावाला दोन-तीन जोरदार कानफटात मारते.
हे देखील वाचा- Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरत होता तरूण अन्…; पुढे जे घडले तुम्हीच पाहा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर rupeshgauri_official35 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेदार प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एक युजरने म्हटले आहे की, ‘पुढच्या दिवाळीपर्यंत ही चकली खात रहा’. तर दुसऱ्या एकाने, ‘सणासुदीला नको मारू बिचाऱ्याला’ असे म्हटले आहे. आणखी एका युजरने ‘कधीतरी भावाची माया पण कर बाई.’ असे म्हटले आहे. या व्हिडिओने बहिण-भावाच्या नात्याचे एक गंमतीशीर रूप समोर आणले आहे. सणासुदीत एकमेकांसोबत असणारा हा प्रेमळ राग, हसणे, रुसणे, हेच नात्याचे खरे सौंदर्य आहे. हाच संदेश देणारा हा व्हिडिओ दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ठरत आहे.
हे देखील वाचा- उठा उठा दिवाळी आली! अलार्म काका नाही तर तात्या विंचू आला…; मजेशीर व्हिडिओ व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.