फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता दिवाली हा सण असल्याने यानिमित्ताने तुम्ही दिवाळी संबंधात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. असे अनेक धक्कादायक आणि गमतीशीर व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहेत. सध्या सगळेजण आपल्या परिवारासोबत दिवाली साजरी करण्यासाठी घरी गेले असून प्रत्येकजण काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या असाच एक दिवाळीशी संबंधित गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ ही मोती साबणाची जाहिरात आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. दिवाळी जवळ आली की, ही जाहिरात सर्वत्र झळकू लागते—टीव्हीवर, सोशल मीडियावर, अगदी रिल्सपर्यंत! ‘अलार्म काका’ दरवाजे ठोकत दिवाळीचे स्वागत करताना दिसतात. पण याच जाहिरातीवर आधारित काही मजेशीर मीम्स आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अशाच एका व्हिडिओने लोकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपटातील आयकॉनिक पात्र तात्या विंचू मोती साबण घेऊन आलेला दाखवला आहे. हा व्हिडिओ महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटातील एका सीनचा वापर करून तयार करण्यात आला आहे. व्हिडिओचे एडिटिंग इतके सफाईदार केले आहे की, मोती साबणाची जाहिरात आणि चित्रपटातील तात्या विंचूचा संवाद यांचा उत्कृष्ट संगम साधला आहे. त्यामुळे तो सीन पाहताना हसू आवरणे खरोखरच कठीण आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @tatya_edit_002 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच मजेशीर आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘दिवाळीला उठवायला आले आहेत की आयुष्यातून उठवायला?’ दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘मोती साबण लावल्यानंतर तात्याचा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा बाहेर!’ आणखी एका युजरने, ‘कुबड्या खविस अलार्म काका’ अशी मजेशीर प्रतिक्रियाही दिली आहे. या व्हिडिओने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.