रीलच्या नादात लोक काय काय नाय करणार... पुलावर केली गर्दी, तरुणाला दोऱ्याने लटकवलं, मुलीला पाण्यात बुडवलं; Video Viral
आजकाल लोकांना रीलचं वेड इतकं लागलं आहे की त्याच्या नादात लोक कधी काय करतील त्याचा नेम नाही. रील बनवणं काही चुकीचं नाही पण आजूबाजूच्या परिस्थितीच भान ठेवून गोष्टी केलेल्या अधिक उत्तम. रीलसाठी आता लोकांनी आपल्या जिवाचीही पर्वा करणं सोडून दिल आहे. याचे अनेक व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यात रीलच्या नादात लोकांनी केलेली एक चूक त्यांच्या आयुष्याला किती मोठं नुकसान करून गेली ते दिसून आलं. आताही एक असाच व्हिडिओ इथे व्हायरल झाला ज्यात रीलसाठी डझनभर लोकांनी एक अनोखा घातक पराक्रम केल्याचे व्हिडिओत दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये इतके हादरवणारे होते की त्यांना पाहताच लोकांना आपल्या कपाळाला हात लावला. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत ?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसतं की, एका पुलावर भरपूर लोकांची गर्दी जमली आहे. हे सर्वच तरुण असून एक स्टंट करण्यासाठी ते इथे जमलेले असतात. एक तरुण पुलावर कापडाच्या एका तुकड्याची दोरी बनवून त्याला लटकत आहे आणि पुलावर असलेले इतर तीन पुरुष तो कापड धरून आहेत. पुलाच्या खाली आपल्याला पाणी वाहत असल्याचे दिसते आणि हा तरुण दोरीला स्वतःला बांधून या पाण्यात खाली उडी मारतो. आता तो असं का करत हे आपल्याला पुढे दिसून येतं. व्हिडिओत पुढे पाहताच समजते की, पुलाच्या खाली पाण्यात एक मुलगी बुडाली आहे आणि तरुण तिला वर खेचण्यासाठी दोरीला लटकला आहे पण भावुक होऊन जाऊ नका कारण हे संपूर्ण एक रचलेलं नाटक होत. तरुणांनी मिळून हे नाटक रचलं आणि व्हायरल होण्यासाठी रील बनवून हे दृश्य शेअर केलं. आता तरुणांचा हा प्रकार व्हायरल तर झाला पण लोकांनी त्याच्या या नाटकाची मन भरून टीका केली. एका रीलसाठी आपला जीव धोक्यात घालणं युजर्सना पटलं नाही आणि लोकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली.
वीडियो बनाने के लिए इतना रिस्क ले रहे है आजकल के युवा 😱 pic.twitter.com/HNy5NfcqhZ
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) September 15, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @ChapraZila नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जहे खरं आहे की फक्त व्हिडिओसाठी बनवण्यात आलं आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्णपणे बकवास आहे हे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा निव्वळ वेडेपणा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.