(फोटो सौजन्य: Instagram)
या जगात सर्वात निस्वार्थी प्रेम करणारी कोणती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात असेल तर ती म्हणजे आपली आई असते. जन्माआधीपासूनच ती पोटात असतानाच ती आपली पुरेपूर काळजी घेते. आपल्या बाळाला काही होणार तर नाही ना, याची चिंता तिला क्षणोक्षणी लागलेली असते. ममतेचे सागर म्हणून ओळखली जाणारी आई वेळ आली तर आपल्या मुलासाठी ढाल बनूनही तयार राहते. आईची ही माया फक्त माणसांमध्येच नाही तर इतर सजीवांमध्येही तितकीच प्रगल्भ असते, हेच पटवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक हत्तीण मृत्यूला झुंझ देताना दिसून आली, तिच्या वेदना व्हिडिओत स्पष्ट दिसून येत होत्या पण आपल्याला होणाऱ्या त्रासाला बाजूला सारून तिची तळमळ आपल्या मुलाला पाहण्यात जास्त दिसून येत होती.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हत्तीणी कशी जमिनीत रुतली गेली आहे. तो यावेळी फार खूप कमकुवत आणि असहाय्य झालेली दिसते. तिचे आयुष्य जास्त काळ टिकणार नाही हे स्पष्ट आहे, परंतु या परिस्थितीतही ती स्वतःला विसरून तिच्या बाळाची काळजी करू लागली आणि तिला तिच्या सोंडेने गुंडाळले. बाळ हत्ती उठू शकत नसल्याने, मादी हत्तीणीला त्याची जास्त काळजी वाटत होती आणि ती त्याला वाचवू इच्छित होती. जणू ती तिच्या मुलाला सांगत होती की ‘काळजी करू नकोस, मी इथे आहे’. हे दृश्य इतके हृदयस्पर्शी आहे की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना पाणी येते. माहितीनुसार, नंतर हत्तिणी आणि तिच्या मुलाला यशस्वीरीत्या वाचवण्यात आले.
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @wildfriends_africa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार, ती वाचली. हत्ती किती सुंदर आत्मा आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देवाचे आभार की ती आणि तिचे बाळ वाचले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी तिला सोडवण्यासाठी माझ्या हातांनी खोदायला सुरुवात केली असती. सुदैवाने आई आणि तिच्या बाळाला मदत करण्यासाठी योग्य लोक आले.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.