(फोटो सौजन्य: X)
पावसाळ्याच्या दिवसांत सापांची दहशत मानवी वस्तीतही दिसून येते. अनेकदा या दिवसांत घराच्या बाथरूममध्ये गांडूळ, गोगलगाय असे प्राणी दिसून येतात पण आता मात्र हद्दच होऊन बसली. व्यक्तीच्या टॉयलेटमध्ये कोणता सामान्य जीव नाही तर चक्क किंग कोब्रा येऊन बसला. जंगलाचा धोकादायक शिकारी म्हणून ओळखला जाणारा किंग कोब्रा बाथरूममध्ये पाहताच व्यक्ती घाबरला आणि त्याने थेट त्याच्यावर पाण्याचा स्प्रे मारायला सुरुवात केली. आता यात पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थानमधील कोटा येथील असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये जेके लोन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरच्या वसतिगृहात अचानक एक किंग कोब्रा दिसला. बाथरूमच्या टॉयलेट पाईपमधून हा नाग थेट कमोडमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांना शौचालयात किंग कोब्रा दिसताच संपूर्ण वसतिगृहात गोंधळ उडाला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की कमोडच्या आतून एक मोठा नाग बाहेर येत आहे. त्याला हाकलण्यासाठी तिथे उपस्थित असलेले लोक जेट स्प्रे फवारून त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतात. परंतु याचा किंग कोब्रावर कोणताही परिणाम होत नाही आणि तो कमोडमधून बाहेर पडतो आणि बाथरूमच्या कोपऱ्यात जाऊन लपू लागतो. किंग कोब्रा इतका लांब होता की सर्पमित्राला त्याला बाहेर काढण्यात अर्धा तासांचा अवधी लागला.
कोटा : रेजिडेंट डॉक्टर्स होस्टल के बाथरूम में बैठे कोबरा ने मचाई दहशत, स्नेक केचर ने किया रेस्क्यू#video | #rajasthan | #kota pic.twitter.com/jJawzF7fCi
— Khushbu_journo (@Khushi75758998) September 15, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Khushi75758998 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आता कमोड उघडताना पण भीती वाटेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तो तिथे आला कसा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सपाला पण एमबीबीएस करायचं असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.