Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’; जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता

ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर 'तारक मेहता...' पाहणाऱ्या ओला कॅब चालकाने प्रवाशाने हटकल्यावर मुजोरी केली आहे. ४५ डिग्रीच्या उन्हात प्रवाशांना उतरवण्याची धमकी दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 02, 2026 | 08:06 PM
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता 'तारक मेहता...'; (Photo Credit- X)

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता 'तारक मेहता...'; (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांच्या जीवाशी खेळ!
  • गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’
  • जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता
सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत असतात. मात्र, सध्या इंटरनेटवर एका प्रवाशाने शेअर केलेला धक्कादायक अनुभव वेगाने व्हायरल होत असून, यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नोएडा ते दिल्ली दरम्यान ओला (Ola) कॅबने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने चालकावर गंभीर आरोप केले आहेत. प्रवाशाच्या दाव्यानुसार, भीषण उष्णतेत प्रवास सुरू असताना कॅब चालक चक्क चालत्या गाडीत मोबाईलवर टीव्ही शो पाहत ड्रायव्हिंग करत होता. या घटनेनंतर रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हा संपूर्ण प्रकार ‘Dreams_realites’ नावाच्या युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. आलेला अनुभव सांगताना प्रवाशाने लिहिले, “दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या ४५ डिग्री सेल्सिअस इतकी भीषण उष्णता आहे. अशा कडक उन्हात मी माझी पत्नी आणि लहान भावासोबत नोएडाहून दिल्लीला जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. मात्र, प्रवास सुरू असताना ड्रायव्हरचे लक्ष रस्त्याऐवजी पूर्णपणे मोबाईलच्या स्क्रीनवर होते, ज्यावर तो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा प्रसिद्ध टीव्ही शो पाहत होता.”

चलती Ola में 45° गर्मी के बीच, ड्राइवर ‘तारक मेहता’ देख रहा था! Noida से दिल्ली जा रहा था, पत्नी और छोटे भाई के साथ। मैंने विनम्रता से बोला कि भैया, स्क्रीन बंद करो, ड्राइविंग पर ध्यान दो। ड्राइवर का जवाब कि “दिक्कत है तो उतर जाओ” हाईवे के बीच परिवार को 45 डिग्री धूप… pic.twitter.com/uUNopNUXxW — Nunu (@Dreams_realites) June 1, 2026


प्रवाशाने पुढे नमूद केले की, अपघात होण्याची भीती वाटल्यामुळे त्याने अत्यंत संयमाने ड्रायव्हरला हटकले. प्रवाशाने ड्रायव्हरला विनंती केली की, “भैय्या, मोबाईलची स्क्रीन बंद करा आणि ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करा.” प्रवाशाने शांतपणे समजावून सांगूनही संबंधित कॅब चालकाने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिले. तो प्रवाशाला म्हणाला, “जर तुम्हाला माझ्या शो पाहण्याने अडचण किंवा त्रास होत असेल, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता या कॅबमधून खाली उतरू शकता.”

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

४५ अंश सेल्सिअसच्या जीवघेण्या उन्हात, कुटुंब सोबत असताना आणि गाडी हायवेवर धावत असल्यामुळे प्रवाशाकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. भर हायवेवर अडकून पडण्यापेक्षा त्यांनी गप्प राहणे पसंत केले आणि अत्यंत भीतीच्या छायेत आपला प्रवास पूर्ण केला. यानंतर प्रवाशाने ओला आणि उबर (Uber) सारख्या नामांकित कंपन्यांना थेट सवाल केला आहे की, “कॅब कंपन्यांसाठी प्रवाशांची सुरक्षा खरोखर महत्त्वाची आहे की ही सुरक्षा केवळ कागदी नियम आणि स्टार रेटिंगपुरतीच मर्यादित आहे?”

नेटकरी संतप्त; कॅब कंपन्यांकडे कडक कारवाईची मागणी

या पोस्टवर हजारो युझर्सनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून कॅब चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका युझरने लिहिले की, “रस्त्याऐवजी मोबाईल स्क्रीनवर लक्ष देणे हे ४५ डिग्रीच्या उन्हापेक्षाही जास्त धोकादायक आहे. कॅब कंपन्यांनी रेटिंगपेक्षा सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.” तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, “हा केवळ निष्काळजीपणा नसून प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. ड्रायव्हिंग करताना व्हिडिओ पाहणे ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये ड्रायव्हरचा परवाना रद्द करून थेट गुन्हा दाखल झाला पाहिजे, केवळ कमी रेटिंग देणे पुरेसे नाही.” या घटनेमुळे आता डिजिटल कॅब सेवांच्या सुरक्षिततेवर नेटकऱ्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

Web Title: Cab driver watched taarak mehta while driving kicked passenger out after being questioned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Cab Driver
  • delhi
  • viral news

संबंधित बातम्या

Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या का? ‘या’ सेवांवर कडक निर्बंध
1

Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या का? ‘या’ सेवांवर कडक निर्बंध

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
3

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
4

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.