Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तू आतंकवादी आहेस”! चालू क्लासरूममध्ये प्रोफेसरने विद्यार्थ्याला 13 वेळा म्हटलं Terrorist; इंटरनेटवर Video चर्चेत

Professor Call Student a Terrorist : जातीवरुन कुणालाही हिणवणं किवा दहशतवादी म्हणणं एक चुकीच बाब असून एका शिक्षकाकडून हे कृत्य घडणं म्हणजे लाजीरवाणीचं गोष्ट. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा शेअर केला जातोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 03:30 PM
"तू आतंकवादी आहेस"! चालू क्लासरूममध्ये प्रोफेसरने विद्यार्थ्याला 13 वेळा म्हटलं Terrorist; इंटरनेटवर Video चर्चेत

"तू आतंकवादी आहेस"! चालू क्लासरूममध्ये प्रोफेसरने विद्यार्थ्याला 13 वेळा म्हटलं Terrorist; इंटरनेटवर Video चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • वर्गात प्राध्यापकाने मुस्लिम विद्यार्थ्याला वारंवार “दहशतवादी” म्हणत अपमान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
  • या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला आणि लोकांनी शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी धरली.
  • प्रकरणाची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे.
भारत ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, याचाच अर्थ राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत. भारतात हिंदू, मुस्लिम, पारसी, ख्रिस्ती अशा सर्वच धर्मांची लोक राहतात. अशावेळी प्रत्येक धर्माचा आदर हा आपल्या भूमीचा आदर मानावा. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माची निंदा करण्याची शिकवण देत नाही. परंतु देशात धर्मावरुन नेहमीच वाद सुरु असतात. अशातच अलिकडे सोशल मिडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा शेअर केला जात आहे ज्यात काॅलेजचे एक प्रोफेसर क्लास घेत असताना एका विद्यार्थ्याला त्याच्या जातीवरुन दहशतवादी म्हणू लागले. विद्यार्थ्याची जात मुस्लिम म्हणून त्याला दहशतवादी बोलणे फार चुकीचे आहे आणि मुख्य म्हणजे एक शिक्षकंच असा भेदभाव विद्यार्थ्यांसमोर करत आहे ही गोष्ट खरंच लाजीरवाणी ठरते.

चीनमध्ये पब्लिक शोमध्ये डान्स करताना रोबोटने लहान मुलाच्या कानशिलात हाणली, नक्की घडलं काय? Video Viral

काय आहे प्रकरण?

सांगण्यात येत आहे की, सदर घटना २४ मार्च रोजी बनशंकरी येथे घडून आली. याचा व्हिडिओ व्हायरल झालयानंतर लोकांनी शिक्षकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणीही केली. चालू वर्गात जेव्हा प्रोफेसर विद्यार्थ्याला जातीवरुन दहशतवादी म्हणत होते तेव्हा एका सहविद्यार्थ्याने या दृष्यांचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर व्हडिओला शेअर केलं. व्हिडिओमध्ये, वाणिज्य विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मुरलीधर देशपांडे एका जोरदार वादात गुंतलेले दिसत आहेत. ते अफान नावाच्या विद्यार्थ्याला ओरडताना ऐकू येतात, “तू दहशतवादी आहेस… काय खातोस? आज मी खूप शांत राहीन असं वाटलं होतं. तुला लाज वाटत नाही का? तू एक निरुपयोगी माणूस आहेस.”

वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राध्यापकाने ‘दहशतवादी’ हा शब्द किमान १३ वेळा वापरला. साक्षीदारांच्या दाव्यानुसार, त्यांनी इतरही गंभीर वक्तव्ये केली, ज्यात “इराण युद्ध तुमच्यासारख्या लोकांमुळे झाले,” आणि “ट्रम्प तुम्हाला संपवतील,” यांचा समावेश होता. या व्हिडिओवर सार्वजनिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र टीका झाल्यानंतर, पीईएस विद्यापीठाच्या कुलपतींनी व्यवस्थापनाने तात्काळ कारवाई केल्याची पुष्टी केली. निलंबनाची पुष्टी करताना, पीईएस विद्यापीठाचे कुलपती जवाहर दोरेस्वामी म्हणाले की, अशा कृत्यांबाबत संस्थेचे ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण आहे.

Muralidhar Deshpande, PES University Professor, referred to the Muslim Student Affan as a “TERRORIST” at least 13 times during a class. Sanghi Mindset has INFECTED even the Top Universities of India. pic.twitter.com/DSc0ssOKcQ — Dr Ranjan (@DocRGM_) March 28, 2026

एक विवाह ऐसा भी! तीन वर्षांपूर्वी महिलेने नदीसोबत केलं लग्न, आता साजरी करतेय एनिव्हर्सरी… अनोख्या लव्हस्टोरीचा Video Viral

दोरेस्वामी म्हणाले, “आम्ही प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही आमच्या तांत्रिक पथकाला सूचना दिल्या आहेत. आम्ही संबंधित प्राध्यापकाला तात्काळ निलंबित केले असून, एक शिस्तपालन समिती पुराव्यांची तपासणी करेल.” निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी विद्यापीठाने आपल्या तांत्रिक पथकाला वर्गातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डिंगची सत्यता पडताळण्याचे कामही सोपवले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Classroom viral video professor calls muslim student terrorist viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Student
  • Teacher
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
1

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral
2

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral

ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral
3

ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video
4

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.