ढगफुटीचा लाइव्ह थरार कधी पाहिला आहे का? पांढरंशुभ्र प्रकाश अन् घर-दुकानांसह सर्वच गेलं वाहून; हृदय हेलावून टाकणारे Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. अशीच एक भीषण घटना सध्या इथे शेअर करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील स्थिती सध्या अतिशय भीषण बनली असून धाराली, मुनि की रेती, आणि इतर अनेक भागांत ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओज शेअर केले जात आहे ज्यातील दृश्यांनी आता आता सर्वांचेच हृदय पिळवटून निघाले आहे. . पावसाच्या तुफानी सरींमुळे नद्यांना प्रचंड पूर आला असून, पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की मोठमोठी घरे, इमारती आणि दुकाने काही क्षणांतच या पुराच्या लाटांमध्ये वाहून गेली आहेत.
धराली गावातील काही फुटेजमध्ये संपूर्ण वस्त्याच पाण्याखाली गेलेली दिसत आहे. ढगफुटीमुळे डोंगरकड्यांवरून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांनी रस्ते, पूल आणि घरे उद्ध्वस्त केली आहेत. काही ठिकाणी मोठ्या हॉटेल्सही जमीनदोस्त झाल्याचे दृश्य समोर आले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक लोक बेघर झाले असून, प्रशासनाकडून मदत कार्य वेगाने सुरू आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या परिस्थितीची संपूर्ण माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेणे सुरू आहे. पावसामुळे संपूर्ण परिसरात चिखल आणि मलब्याचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. स्थानिक नागरिक आपले जीवन आणि संसार वाचवण्यासाठी धडपड करत आहेत.
उत्तराखंड में बड़ी आपदा – उत्तरकाशी के धराली में बादल फटा, बड़ी संख्या में लोगों के लापता होने की सूचना आ रही है। इस Video को देखकर नुकसान का अंदाजा लगा सकते हैं। pic.twitter.com/WmpxDWBeLd — Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 5, 2025
उत्तरकाशी – कुछ देर पहले तक जहां मार्केट, घर, होटल थे। वहां अब सिर्फ बाढ़ का पानी और मलबा दिख रहा है। जो बिल्डिंग बची हैं, मलबे से ढक गई हैं। मौत, लापता, नुकसान का अभी कोई आंकलन नहीं किया जा सकता। pic.twitter.com/8TEqId6M0U — Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 5, 2025
Heartbreaking visuals from ground zero in Uttarkashi. The entire town is covered in debris and water levels continue to rise. This monsoon is turning into a nightmare. Prayers for all those affected.
#Uttarkashi pic.twitter.com/C7Gy6p6R7l — Nikhil saini (@iNikhilsaini) August 5, 2025
या घटनेचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर झाले आहेत आणि कमी वेळेत व्हायरल देखील झाले आहेत. जे काही व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत, ते पाहून देशभरातील लोक घटनेतील पिडीतांवर हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर लोक प्रार्थना करत असून, अधिकाऱ्यांनी तात्काळ आणि प्रभावी पावले उचलावी, अशी मागणी आता केली जात आहे. उत्तरकाशीतील ही स्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओजमधून लावता येते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.