Couple Bike Stunt gone wrong video goes viral
Couple Stunt Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्रविचित्र गोष्टींचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. गेल्या काही काळात लोकांचे धोकादायका स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे, पण लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत. यामध्ये विशेष करुन तरुण मुला-मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कपल बाईक स्टंट करायला गेला होता, पण त्यांच्या स्टंट असा फसला आहे की यामुळे भयंकर अपघात घडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी स्पोर्ट्स बाईकचे हेल्मेट घालून उभी आहे. याच वेळी दुसऱ्या बाजूने एक तरुणी बाईकवरुन स्पीड मध्ये येत आहे. तरुणी तरुणी जवळ येताच बाईक मागच्या बाजूने हवेत उडवतो आणि याच वेळी अचानत त्याचा तोल जातो. यामुळे बाईकचे चाक तरुणीला जोरात लागते आणि ती खाली आदळते. दोघांना नेमकं काय स्टंट करायचा असतो हे तर समजले नाही, पण यामुळे मात्र त्यांना चांगलीच अद्दल घडली आहे की कदाचित पुन्हा कधी असा स्टंट करण्याची हिंम्मत करणार नाहीत.
स्टंटचे प्रकार
गेल्या काही काळात सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक अनेक धोकादायक, अजीबो-गरीब प्रकारचे स्टंट करत आहे. कोणी वेगाने बाईक चालवून हवेत उडवण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी धावत्या बाईकवर उभे राहण्याचा स्टंट करत आहे. कोणी डोंगराच्या कठड्यावर असलेल्या झाडावर जाऊन डान्स स्टंट करत आहे. तर कोणी धावत्या ट्रेनमध्ये चढण्या-उतरण्याचा स्टंट करत आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करुन लोकांना व्हायरल होण्याचे वेड लागले आहे.
Lo bhai ban gayi reel 😭 pic.twitter.com/LjdynZ7NIL — Vishal (@VishalMalvi_) October 3, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्सवर @VishalMalvi_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १३ हजार व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओ मज्जा घेतली आहे. एका नेटकऱ्याने झाली रिल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने नको ते उद्योग अंगलट आले असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने खतरों के खिलाडी असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.