स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Stunt Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर कधी धोकादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. अलीकडे स्टंटबहाद्दरांचा प्रताप वाढत चालला आहे. कोणी ना कोणी रोज धोकादायक स्टंट करत आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे, पण याची कोणालाही पर्वा राहिलेली नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाच तरुणांनी धोकादायक स्टंट केला आहे. यामुळे त्यांनी स्वत:चा आणि त्यांच्या आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. सध्या त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघनही केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाच तरुण एका स्कूटीवरुन चालले आहेत. चार जण स्कूटीवर बसलेले आहे, तर एकाला या चार जणांना हवेत उचलून धरले आहे. तसेच यातील एकाने पण हेल्मेट घातलेले नाही. शिवाय स्कूटी देखील वेगाने चालवली जात आहे. याचा व्हिडिओ तेथूनच जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने रेकॉर्ड केला आहे. पण या तरुणांना जीवाचे गांभीर्य नाही. यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे.
व्हायरल व्हिडिओ
शहर के नेशनल हाईवे पर पुराने पेट्रोल पंप के पास वायरल वीडियो में पांच युवक स्कूटी पर क्षमता से अधिक सवार होकर तेज रफ्तार में स्टंट करते दिख रहे हैं। यह खतरनाक व्यवहार आम लोगों की जान के लिए जोखिम है आप से अनुरोध है तुरंत जांच और कार्यवाही की जाए। @BijapurPolice @CG_Police pic.twitter.com/5OHIstO6eK — Ilyas (@Ilyas_SK_31) September 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @Ilyas_SK_31 एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, सुरुवातील डेड बॉडी असल्यासारखे वाटले, तर दुसऱ्या एकाने यांना फाईन पडला पाहिजे जब्बर असे म्हटले आहे. तर काही लोकांनी अशा गैरवर्तूणूकीवर कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही काळात सोशल मीडिया धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाणा वाढले आहे. यामध्ये विशेष करुन लहान मुलांचा समावेश आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. पण लोकांना जीवाची पर्वा राहिलेली नाही. लोक बेधडकपणे स्टंटबाजी करत आहे. कधी धवात्या ट्रेनमध्ये चढण्याचा, तर कधी बाईकवर धोकादायक स्टंट करण्याचे सुरुच आहे. यामुळे काहीजण अशा गोष्टींवर संतापही व्यक्त करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.